Ananya Pandey : ब्रेकअपनंतर स्वत:ला खोलीत कोंडून रडत बसते अनन्या पांडे; आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव
Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडे ब्रेकअपनंतर स्वत:ला खोलीत कोडूंन रडत बसते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.
Ananya Pandey : अनन्या पांडे (Ananya Pandey) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'खो गए हम कहाँ' (Kho Gaye Hum Kahan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'गहराइयां' (Gehraiyaan) या सिनेमानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा सिद्धांत चतुर्वेदीसह (Siddhant Chaturvedi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अनन्या अनेकदा आदित्य रॉय कपूरसोबतच्या (Aditya Roy Kapoor) रिलेशनमध्ये चर्चेत असते.
'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात अनन्या पांडेने नकळत आदित्य रॉय कपूरसोबतच्या रिलेशनबद्दलची हिंट दिली होती. तर दुसरीकडे आदित्यने करणला आधिच सांगितलं होतं की,"खोटं बोलावं लागेल असे काही प्रश्न विचारू नकोस". दरम्यान अनन्याचं एक वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे. अभिनेत्रीने ब्रेकअपमधून कशी बाहेर पडते याबद्दल भाष्य केलं आहे.
ब्रेकअपमधून कशी बाहेर पडते अनन्या पांडे?
अनन्या पांडेने नुकतीच आज तकच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी ब्रेकअपमधून कशी बाहेर पडते? असा प्रश्न अनन्याला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत अनन्या म्हणाली,"मी स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन रडते आणि आयस्क्रीम खाते. एकांतात रडायला मला आवडतं". ब्रेकअपमधून कसं बाहेर पडायचं हे सांगत अनन्या म्हणाली,"ब्रेकअपमधून आरामात बाहेर पडायचं..घाई करायची नाही..आणि आयस्क्रीन खायची".
अनन्या पांडे कधी लग्न करणार? (Ananya Pandey on Wedding)
'ड्रीम गर्ल 2' फेम अभिनेत्री अनन्या पांडे लग्न कधी करणार? याबद्दल उत्तर देत म्हणाली,"मला प्रेमविवाह करायला आवडेल. माझ्या आई-वडिलांचा संसार प्रेम, आदर आणि मैत्रीवरचं टिकून आहे. मीदेखील त्यांचा फंडा फॉलो करणार आहे. खरंतर मी खूपच रोमँटिक आहे. प्रेमावर माझा विश्वास आहे. आता मी फक्त 26 वर्षांची आहे. त्यामुळे लग्नाबद्दल अजून तरी विचार केलेला नाही. अजून मला खूप काम करायचं आहे".
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय अनन्या पांडे
अनन्या पांडे सध्या आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनन्याचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लवकरच तिचा 'खो गए हम कहां' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या