Mukesh Ambani : "अनंतमध्ये मी माझे वडील धीरूभाई अंबानी यांना पाहतो"; लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश अंबानी भावूक
Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट यांच्या शाही प्री-वेडिंगने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान अनंतमध्ये मी माझे वडील धीरुभाई (Dhirubhai Ambani) यांना पाहतो, असं वक्तव्य मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलं आहे.
Mukesh Ambani on Anant Ambani : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चेंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये सध्या अनंत-राधिका यांचं प्री-वेडिंग पार पडत आहे. दरम्यान प्री-वेडिंग कार्यक्रमात पाहुण्यांसोबत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की,"मी जेव्हा अनंतला पाहतो तेव्हा मला त्याच्यात माझे वडील धीरूभाई (Dhirubhai Ambani)दिसतात".
मुकेश अंबानी काय म्हणाले? (Mukesh Ambani Emotional Speech)
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात पाहुण्यांसोबत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की,"भारतीय संस्कृतीत आपण पाहुण्यांना अतिथि म्हणतो. 'अतिथि देवो भव' ही आपली संस्कृती आहे. अतिथिला देवाचा दर्जा दिला जातो. तुम्हा सर्वांमुळे हा लग्नाचा माहोल मंगलमय झाला आहे".
मुकेश अंबानी पुढे म्हणाले,"अनंत-राधिका आता नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. धीरूभाई आज या जगात नसले तरी त्यांचा आशीर्वाद आहे. आज आपल्या नातव्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस पाहताना त्यांना नक्कीच आनंद होत असेल. जामनगर माझी आणि माझ्या वडिलांची कर्मभूमी आहे".
अनंतमध्ये मला अनंत शक्ति दिसते : मुकेश अंबानी
मुकेश अंबानी अनंतबद्दल बोलताना पुढे म्हणाले,"अनंतचा संस्कृतमध्ये अर्थ ज्याचा अंत नाही असा होतो. अनंतमध्ये मला अनंत शक्ति दिसते. अनंतला जेव्हा मी पाहतो तेव्हा मी त्याच्यात माझे वडील धीरूभाई अंबानी यांना पाहतो. अनंतचं वागणं-बोलणं हे वडिलांसारखं आहे. अनंतमध्ये मला अनंत शक्ति दिसते".
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट येत्या काही महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी जामनगरमध्ये त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस हा प्री-वेडिंग कार्यक्रम चालणार आहे. बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत.
प्री-वेडिंगमध्ये पहिल्या दिवशी 'An Evening in Everland' हा कार्यक्रम पार पडला. एलीगेंट कॉकटेल असा या कार्यक्रमाचा ड्रेसकोड होता. दुसऱ्या दिवशी अर्थात 3 मार्च 2024 रोजी 'A Walk on the Wildside' हा कार्यक्रम असणार आहे. जंगल फिव्हर हा या कार्यक्रमाचा ड्रेस कोड आहे. तर तिसऱ्या दिवशी 'Tusker Trails' आणि 'Hastakshar' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॉयल प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संबंधित बातम्या