Amol Kolhe : 'महाराजांचे दैवतीकरण करण्यापेक्षा त्यांचा प्रयत्नवाद बिंबवण्याची जास्त गरज'; अमोल कोल्हेंचं मत
आग्रा येथील लाल किल्ल्यात चित्रित होणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा पहिला मराठी चित्रपट आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत.
Amol Kolhe : अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. आग्र्यातल्या लाल किल्ल्यात चित्रित होणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा पहिला मराठी चित्रपट आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाबद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, 'केवळ मुघलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला स्वाभिमान काय असतं हे महाराजांनी दाखवून दिलं. कलाकार म्हणून या वास्तुत, या पेहरावात पाऊल टाकायला मिळणं हे माझं परमभाग्य आहे.'
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची लाटआणणाऱ्या चित्रपच निर्माते- दिग्दर्शकांमा अमोल कोल्हेंनी इशारा दिला. यावेळी ते म्हणाले, तर्कशुद्ध पद्धतीने महाराजांचे वितार मांडावेत. इतर कोणाच्या शिवभक्तीवर मी कमेंट करू शकत नाही. प्रत्येक लेखकाला महाराजांवर काम करायला मिळणं हे स्वप्नवत, इतिहास आपल्या रक्तात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करण्यापेक्षा त्यांचा जो प्रयत्नवाद आहे तो बिंबवण्याची जास्त गरज आहे. इतिहास अभिनेवेशातून सांगण्यापेक्षा वस्तुस्थितीतून सांगा.'
अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली खंत
अमोल कोल्हे म्हणाले, 'महाराष्ट्रातला पर्यटक मुंबईतून औरंगाबाद अजंठा वेरूळ लेणी पाहायला जातो. त्याला महाराजांच्या किल्ल्यांकडे कसं वळवता येईल याचा विचार झाला पाहिजे. आग्र्यातल्या लाल किल्ल्यातदिसणारी पर्यटकांची रीघ आपल्या किल्ल्यांकडे का दिसत नाही? एकदा महाराजांना दैवत्व दिलं की माझ्या तरुणाईची जबाबदारी संपते. एवढी भव्य वास्तू आहे पण या वस्तूवर राज्य करणाऱ्या कुठल्याच राजाचं नाव घेतलं जात नाही जितकं महाराजांचं नाव घेतलं जातं.' लाला किल्ल्याबाबत अमोल कोल्हे म्हणाले,'लाल किल्ल्याच्या भिंतींना बोलता येत असतं तर अमोल कोल्हे सोडून द्या पण जिरेटोप आणि कवड्यांची माळ पाहून थरारल्या असत्या.'
हेही वाचा: