एक्स्प्लोर

Amol Kolhe : मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही... अमोल कोल्हेंनी केली 'शिवप्रताप-गरुडझेप' सिनेमाची घोषणा

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप-गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

Shiv Pratap Garudzep : अनेक ऐतिहासिक मालिका आणि सिनेमांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) काम केलं आहे. तर दर्जेदार ऐतिहासिक मालिकांची आणि सिनेमांची निर्मितीदेखील अमोल कोल्हेंनी केली आहे. आता अमोल कोल्हेंनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'शिवप्रताप-गरुडझेप' (Shiv Pratap Garudzep) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे. 

रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा आहे. टीझर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

आज या सिनेमाचा 'टीझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य सिनेमाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचे चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.

'शिवप्रताप-गरुडझेप' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक राजारामने सांभाळली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच हा सिनेमा 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही असं म्हणत अमोल कोल्हेंनी या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 

संबंधित बातम्या

Swarajya rakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आता सिनेमाद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amol Kolhe : डॉ अमोल कोल्हे यांचा 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget