Amol Kolhe: 'माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...'; खासदार अमोल कोल्हेंच्या व्हिडीओनं वेधलं लक्ष
एक व्हिडीओ शेअर करुन अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत नेटकऱ्यांना सांगितलं आहे.

Amol Kolhe: खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. राजकारण, कला अशा विविध विषयांवर आधारित पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत नेटकऱ्यांना सांगितलं आहे. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं , अशा कविता म्हणायला फार मज्जा वाटते. त्या कविता चांगल्या वाटतात. पण प्रेम व्यक्त करायला ताकद लागते. तेवढीच ताकद प्रेमाची कबुली देण्यासाठी देखील लागते. त्यात जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर आणखी ताकद लागते.एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे तीन प्रकार असतात. A- लग्नाआधी जुळलेलं, B- लग्नानंतर जुळलेलं आणि C-लग्नाआधी जुळून लग्नानंतर देखील सुरु असलेलं. हे सगळं आज सांगण्याची गरज आहे कारण आज मी माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची तुमच्या समोर कबुली देणार आहे. कोण आहे ती? कशी आहे ती? याबद्दल सांगणार आहे. आज ओळख करुन देतोय माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची...'
कोणासोबत आहे अमोल कोल्हे यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?
अमोल कोल्हे यांचे अमोल ते अनमोल या नावाचे एक युट्यूब चॅनल आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संपूर्ण माहिती त्यांच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करुन दिली आहे. अमोल कोल्हे यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे एका बुलेटसोबत आहे. व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, माझी बुलेट ही मुळची पुण्याची आहे पण सध्या मुंबईत असते. 'मी अनेक वेळा माझ्या बुलेटसोबत वेळ घालवतो', असंही अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अमोल कोल्हे यांना इन्स्टाग्रामवर 864K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
