Amol Kolhe: अमृता खानविलकर अमोल कोल्हेंसोबत लग्नगाठ बांधणार? एका बातमीनं खळबळ, खासदार अमोल कोल्हेंनी शेअर केली पोस्ट
काल (1 एप्रिल) अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
Amol Kolhe: खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. काल (1 एप्रिल) अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
अमोल कोल्हे यांची पोस्ट
अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार आहे, असं त्या बातमीमध्ये लिहिलं आहे. या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!' अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अमोल कोल्हे यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनं देखील अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट केली आहे. 'हे काय आहे', अशी कमेंट अमृतानं केली. एका नेटकऱ्यानं अमोल कोल्हे यांच्या पोस्टला कमेंट केली, 'हद्द पार करतात लोक' एका युझरनं अमोल कोल्हे यांच्या पोस्टला कमेंट केली, 'अवघड आहे सगळं... पण ती शेवटची ओळ बापरे...'
अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधरित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 840K एवढे फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अमोल कोल्हे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.
महत्वाच्या इतर बातम्या :
Nashik News : 18 एकर परिसर, तीन मजली सेट, 200 कलाकार, नाशिकमध्ये रंगणार 'शिवपुत्र संभाजी'