Jaya Bachchan: 'पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीवर जया बच्चन यांची दृढ श्रद्धा'; बिग बींनी दिली माहिती
‘कौन बनेगा करोडपती 14’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांगितलं की, जया बच्चन (Jaya Bachchan) यांची पुण्याच्या (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर दृढ श्रद्धा आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. बिग बी हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य याबाबत चाहत्यांना सांगतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन सांगितलं की, जया बच्चन (Jaya Bachchan) यांची पुण्याच्या (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) दृढ श्रद्धा आहे. यामागचे कारण देखील यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
जया बच्चन या अनेकवेळा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्याला जात असतात. ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यावेळी देखील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जया बच्चन या पुण्याला गेल्या होत्या.
केबीसीच्या एका एपिसोडमध्ये पुण्याच्या मुजाहिद मोमिन यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ही फेरी जिंकून हॉट सिटवर बसण्याची संधी मिळाली. कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी 1884 साली महाराष्ट्रात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? असा प्रश्न मुजाहिद मोमिन यांना अमिताभ बच्चन यांनी विचारला. त्यानंतर मुजाहिद यांनी या प्रश्नाचं लोकमान्य टिळक हे अचुक उत्तर दिले. त्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबाबत बिग बींनी सांगितलं. ते म्हणाले, 'जया बच्चन या पुण्यातील एफटीआयआय येथे शिकत होत्या. त्यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.'
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. अमिताभ यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
जया बच्चन या विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. जया बच्चन यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये जया यांच्यासोबत रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Happy Birthday Jaya Bachchan : रियलच नाही, तर रील लाईफमध्येही गाजली ‘जया-अमिताभ’ यांची जोडी!