Amitabh Bachchan injured: 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन झाले जखमी; हैदराबादमध्ये सुरु होतं शूटिंग
Amitabh Bachchan Injured : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ब्लॉगच्या माध्यमातून शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीबाबत माहिती चाहत्यांना दिली आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना माहिती दिली की, त्यांना एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहेत. शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Amitabh Bachchan Injured : ब्लॉगद्वारे दिली हेल्थ अपडेट
बिग बींनी ब्लॉगमध्ये लिहिलं, 'हैद्राबादमध्ये मी प्रोजेक्ट के या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी अॅक्शन सीन शूट करत असताना मी जखमी झालो. उजव्या बरगडीला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे शूट रद्द केले. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करून घरी परतलो. सध्या विश्रांती घेत आहे. हे वेदनादायक आहे. हालचाल आणि श्वासोच्छवास घेताना त्रास होत आहे. पूर्ण बरे व्हायला काही आठवडे लागतील. वेदना होत आहेत, त्यासाठी काही औषधे देखील घेत आहे.' ब्लॉगमध्ये बिग बींनी लिहिले की, सध्या ते मुंबई येथील त्यांच्या जलसा या बंगल्यामध्ये विश्रांती घेत आहेत.
'दुखापतीमुळे काम थांबवले आहे. उपचार पूर्ण होईपर्यंत सर्व काम बंद राहणार आहे. मी जलसामध्ये विश्रांती घेत आहे आणि कामासाठी मोबाईलचा वापर करत आहे. मला आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना भेटता येणार नाही. त्यामुळे कृपया येऊ नका.' असंही बिग बींनी ब्लॉगमध्ये लिहिलं.
Amitabh Bachchan Injured : 'प्रोजेक्ट के' मध्ये 'हे' कलाकार साकारणार मुख्य भूमिका
प्रोजेक्ट के या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रभास (Prabhas) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बी, प्रभास आणि दीपिकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
Amitabh Bachchan Injured : अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही महिन्यांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र, ऊंचाई आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. आता ते प्रोजोक्ट के या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: