एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Video: बिग बींनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची भेट घेतली.

Amitabh Bachchan Video:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांची भेट घेतली. त्यानंतर बिग बींनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन सौदीतील किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिसत आहेत. यादरम्यान अमिताभ यांनी रियाद एसटी-11 आणि पीएसजी फुटबॉल टीमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बींनी फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली.

अमिताभ बच्चन यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'रियाधमधली एक संध्याकाळ... क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत. PSG विरुद्ध रियाध सीझन्स.. अविश्वसनीय' अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओला विराट कोहली, अरमान मलिक, संजय कपूर यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बिग बी प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार

केबीसीसारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता बिग बी हे प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Jaya Bachchan: 'अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे'; फोटोग्राफरवर पुन्हा भडकल्या जया बच्चन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 May 2024Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊतTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget