प्रतिमा सुधारण्यासाठी नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ बच्चन यांची मदत? व्हायरल पोस्टवरुन प्रश्न उपस्थित
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बक्कळ पैसे घेतल्यामुळे झालेली मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी नानावटी रुग्णालय अमिताभ बच्चन यांची मदत घेत असल्याचा दावा व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशभरातून अमिताभ आणि अभिषेक यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. परंतु, यामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबाबत सोशल मीडियावर एक फेक न्यूज वेगाने व्हायरल होत आहे. पिता-पुत्रांमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणं नसल्याचा हवाला देण्यात येत आहे. तरिही या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच नानावटी रुग्णालयावरही अनेक गंभीर आरोप लावले जात आहेत.
असं सांगण्यात येत आहे की, 'कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बक्कळ पैसे घेतल्यामुळे झालेली मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी नानावटी रुग्णालय अमिताभ बच्चन यांची मदत घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असं सांगण्यात येत आहे की, जुहूमध्ये अमिताभ यांचे तीन बंगले आहेत. त्यामुळे अमिताभ आणि अभिषेक यांना घरातच क्वॉरंटाईन होण्यास काहीही हरकरत नव्हती. तरिही ते रुग्णालयात दाखल झाले. तसेच या पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अमिताभ यांच्या बंगल्यामध्ये मिनी आयसीयूची सुविधा आणि काही डॉक्टर्सही उपलब्ध आहेत.
एवढचं नाहीतर, व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या रेडियंट केयर ग्रुप अंतर्गत नानवटी हॉस्पिटल येत, त्या हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये अमिताभ बच्चन हे स्वतः बोर्ड मेम्बर आहेत.
पाहा व्हिडीओ : अमिताभ बच्चन यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद, नानावटी रुग्णालयाची माहिती
रुग्णालयाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये अमिताभ यांचा सहभागी नाही
व्हायरल पोस्टमधून करण्यात आलेले सर्व आरोप नानावटी रुग्णालयाकडून फेटाळण्यात आले आहेत. रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडियंट लाइफ केयर किंवा नानावटी रुग्णालयाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश नाही.'
मेडिकल सल्ल्यानुसार रुग्णालयात भर्ती होण्याचा निर्णय
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, '65 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आणि माइल्ड लक्षणं असणारी अशी व्यक्ती जिला इतरही आजार आहेत. त्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रुग्णालयात भर्ती होण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती आजारी आहे आणि यावेळी रुग्णालयात भर्ती आहे. अशावेळी टीका करणं टाळलं पाहिजे. कोरोनाची बाधा कोणालाही होऊ शकते. त्यामुळे आपली काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
बिग बी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चनची प्रकृती स्थिर, काळजीचं कारण नाही
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
बिग बी यांच्या उत्तम प्रकृतीसाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना, शोएब अख्तरचं ट्वीट