वर्षाला दीड कोटींची कमाई, सहा वेळा परदेशवारी, बिग बींचे माजी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदेंवर कारवाईचा बडगा
जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांच्या विभागीय चौकशीमध्ये त्यांनी पोलीस सेवा नियमांच उल्लंघन केल्याचा समोर आले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई पोलीस दलातून 'सक्तीने सेवानिवृत्त' करण्यात आले आहे.
Jitendra Shinde: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे माजी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांना मुंबई पोलीस दलातून बुधवारी (21 डिसेंबर) 'सक्तीने सेवानिवृत्त' करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे हे वर्ष 2015 पासून बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या सुरक्षेत होते. पण 2021 मध्ये पोलीस सेवेच्या नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली होती. जितेंद्र शिंदे यांच्या विभागीय चौकशीमध्ये त्यांनी पोलीस सेवा नियमांच उल्लंघन केल्याचा समोर आले आहे.
वर्षाला दीड कोटींची कमाई, सहा वेळेस परदेशवारी
जितेंद्र शिंदे यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन करून पत्नीच्या नावे खासगी सुरक्षा एजन्सी स्थापन केली होती. तपासात असे समजले की शिंदे हे वर्षाला दीड कोटींची करत होते. जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. जितेंद्र शिंदे हे 6 वेळा परदेशात गेले त्यात सिंगापूर , सौदी अरेबिया आणि इतर देशाचा समावेश आहे आणि तेही पोलिसांची परवानगी शिवाय गेल्याचा समजला आहे.त्यांनी कोट्यवधींची संपत्ती खरेदी केली. मात्र शिंदे यांनी वरील सर्व माहिती पोलीस खात्यापासून लपवली, तपासात समोर आला आहे.
जितेंद्र शिंदे यांनी वरील माहिती लपवून पोलीस सेवा नियमांचा उल्लंघन केला. या संदर्भात जितेंद्र शिंदे यांना या महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस दिली गेली होती. मात्र त्यांचे उत्तर असमाधानकारक होते. म्हणून जितेंद्र शिंदे यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची पोलीस विभागानं दिली आहे.
अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे.
जितेंद्र शिंदे यांची झाली होती बदली
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फर्मान काढलं होतं की, चार वर्षांपेक्षा अधिक काळ कुणीही व्यक्ती एका पदावर, एका पोलिस स्टेशनला नसेल. या नियमांतर्गत शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आता शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्या सेक्युरिटीमधून काढून डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती.
पोलीस दलातून करण्यात आलं होतं निलंबित
जितेंद्र शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्यानं ही कारवाई करण्यात आली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
अमिताभ बच्चन यांचे माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित, विभागीय चौकशी करण्याचे आदेश