Allu Arjun : अल्लू अर्जुनने घेतली संजय लीला भन्साळींची भेट, नव्या सिनेमात करणार एकत्र काम?
Allu Arjun : 'पुष्पा' सिनेमामुळे अल्लू अर्जुन चर्चेत आहे.
Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. अशातच अल्लू अर्जुन मुंबईत संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची भेट घेतली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे लवकरच ते एकत्र काम करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी अल्लू अर्जुन संजय लीला भन्साळींच्या कारमधून बाहेर पडला. त्यावेळी पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा आणि संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'पुष्पा-द रूल' असे असणार आहे. हा सिनेमा 2022 च्या डिसेंबरमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Bollywood Films : मोंदीच्या काळात विरोधी पक्षांवर टीका करणारे 'हे' सिनेमे झाले प्रदर्शित
Mishan Impossible : तापसी पन्नूच्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाचा ट्रेलर आऊट
Top Gun Maverick : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा होणार प्रीमिअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha