एक्स्प्लोर

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...

Kaun Banega Crorepati 18 Amitabh Bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या सीझनचे कंटेस्टंट बबलू कुमार पंडित यांचा अमिताभ बच्चन यांच्याशी झालेला त्यांचा संवाद चर्चेचा विषय ठरलाय.

Kaun Banega Crorepati 18 Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या प्रसिद्ध 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 18) या टेलिव्हिजन शोचा (Television Show) सुरू झालाय. या सीझनमध्ये 'बिग बी' (Big B) यांनी त्यांचे पहिले स्पर्धक बबलू कुमार पंडित यांचं दिमाखात स्वागत केलं. पण, झालं उलटंच, कंटेस्टेंटला हॉटसीटवर (KBC Hotseat) बसायला घेऊन जाणारे अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) यांना 'कौन बनेगा करोडपती'च्या (Kaun Banega Crorepati) 18 व्या सीझनमध्ये मात्र, स्पर्धकानं हॉटसीटवर बसवलं. सध्या या कंटेस्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

25 लाख रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यानंतर 50 लाख रुपयांच्या प्रश्नावर बबलू कुमार पंडित बाद झाले असले, तरी अमिताभ बच्चन यांच्याशी झालेला त्यांचा संवाद मात्र चर्चेचा विषय ठरलाय. 

'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमाच्या 18 व्या सीझनचे पहिले स्पर्धक म्हणून बबलू कुमार पंडित 'हॉट सीट'वर बसले. मूळचे बिहारमधील भागलपूरचे असलेले आणि सध्या दिल्लीतील कामगार मंत्रालयात 'सीनियर असिस्टंट' म्हणून कार्यरत असलेल्या बबलू यांनी या कार्यक्रमात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण म्हणजे, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोरच अभिषेक बच्चन यांचं केलेलं कौतुक. 

अभिषेक बच्चनबद्दल काय म्हणाले बबलू कुमार पंडित? (KBC Contestant On Abhishek Bachchan)

दरम्यान, बबलू कुमार पंडित यांनी बिग बींचे पुत्र अभिषेक बच्चन यांचं असं काही कौतुक केलं की, खुद्द अमिताभही अवाक् झाले. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करतानाच बबलू यांनी अभिषेकचंही भरभरून कौतुक केलं. त्यांनी अमिताभ यांना सांगितलं की, जर अभिषेक अभिनेता नसता, तर तो एक उत्तम बिझनेसमन बनू शकला असता... इतकंच नाही तर, बबलू यांनी अभिषेकच्या अभिनयाचंही खूप कौतुक केलं. 'द बिग बुल' आणि 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमांमधील अभिषेकच्या उत्कृष्ट अभिनयानं आपण किती प्रभावित झालो आहोत, हे त्यानं व्यक्त केलं. त्यानं गमतीनं असंही म्हटलं की, सिनेमांमध्ये अभिषेकनं जी कामगिरी केलीय, ती कदाचित अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकणारी ठरू शकेल.

हे ऐकून 'बिग बी' यांनाही आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला. बबलू कुमारनं 13 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन 50 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली होती. मात्र, त्याच्याकडे कोणतीही 'लाइफलाइन' शिल्लक नसल्यामुळे आणि 14 व्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिल्यामुळे त्याला ती बक्षीस रक्कम जिंकता आली नाही.

अभिषेक बच्चनचं कौतुक करताना बबलू कुमारनं ज्या सिनेमांचा उल्लेख केला, त्यापैकी 'आय वॉन्ट टू टॉक' सिनेमासाठी अभिषेकला 'फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार मिळाला. या सिनेमाचं दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं होतं आणि समीक्षकांकडून या सिनेमाला मोठी पसंती मिळालेली. 

'कौन बनेगा करोडपती 18' (KBC 18) चा शुभारंभ 10 ऑगस्ट रोजी झाला. हा कार्यक्रम रात्री 9 वाजता 'सोनी लिव्ह' (SonyLIV) आणि 'सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन'वर पाहता येईल. या सीझनची संकल्पना 'सोचना पडेगा' अशी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget