एक्स्प्लोर

Alibaba Aani Chalishitale Chor : 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' यांचा नेमका गुन्हा काय? उत्सुकता वाढवणारं पोस्टर आऊट

Alibaba Aani Chalishitale Chor : 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Alibaba Aani Chalishitale Chor : 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' (Alibaba Aani Chalishitale Chor) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करणयात आली होती. एकापेक्षा एक कलाकार असणाऱ्या या सिनेमाचं उत्सुकता वाढवणारं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ हा मल्टिस्टारर सिनेमा येत्या 29 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय.

तगडी स्टारकास्ट असणारा 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’

आता यामागचे गुपित मात्र चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे. यात मु्क्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

आदित्य इंगळे दिग्दर्शित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’ या सिनेमाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे, तर  नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Mukta Barve (@muktabarve)

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात,"अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे". 

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे. सिनेमाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे का गुन्हा आहे आणि हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget