Alia Bhatt : आलिया भट्टने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केलं? करण जोहरचं वक्तव्य चर्चेत
Alia Bhatt : आलिया भट्टने एका आठवड्यात दोनदा लग्न केलं असं वक्तव्य करण जोहरने केलं आहे.
Alia Bhatt Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आलियाने एकाच आठवड्यात दोन लग्न केली असल्याचं वक्तव्य करण जोहरने (Karan Johar) केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सिनेमातील 'कुडमयी' हे गाणंही प्रेक्षकांना आवडलं आहे. या गाण्याचं शूटिंग जैसलमेरमध्ये करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
करण जोहरचं वक्तव्य चर्चेत
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील 'कुडमयी' या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक करण जोहर म्हणाला,"आलिया आणि रणबीर कपूरच्या खऱ्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत 'कुडमयी' या गाण्याच्या शूटिंगचे शेड्यूल आम्ही तयार केले होते. आलियाच्या ‘रिअल’ लाइफ लग्नानंतर आम्ही या ‘रील’ लग्नाचे शूट केले. त्यामुळे आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केले. तिच्या खऱ्या लग्नाची मेहंदी माझ्या टीमने फक्त डार्क केली होती.”
आलिया-रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' लवकरच पार करणार 100 कोटींचा टप्पा
आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांत 146.5 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार कले. एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'ओपनहाइमर' (Oppenheimer), 'बार्बी' (Barbie) या हॉलिवूड सिनेमांचा बोलबाला असताना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या बॉलिवूडपटदेखील धुमाकूळ घालत आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाची निर्मिती 160 कोटींमध्ये करण्यात आली आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. करण जोहरने सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
संबंधित बातम्या