Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलियाची खास पोस्ट, चाहत्यांचे मानले आभार, मिसेस कपूर म्हणाली....
Alia Ranbir Wedding : आलिया भट्टने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.
![Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलियाची खास पोस्ट, चाहत्यांचे मानले आभार, मिसेस कपूर म्हणाली.... Alia bhatt sharing special post after marriage thanks to fans photo goes viral on social media Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलियाची खास पोस्ट, चाहत्यांचे मानले आभार, मिसेस कपूर म्हणाली....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/5989d1edd5a4a23a2fabe086d93bb324_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतेच आलियाने लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत आलियाने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आलियाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आभार". आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे खास कॅप्शन लिहिले आहे.
मुंबईतल्या वांद्रे येथील 'वास्तू' बंगल्यावर आलिया-रणबीरचा लग्नसोहळा पार पडला. रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी उपस्थित होती. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.
View this post on Instagram
'रालिया'च्या लग्नातील सुपर मेन्यू काय होता?
25 प्रकारचे शाकाहारी खाद्यपदार्थ, 50 हून अधिक पाककृती, विगन खाद्यपदार्थ, दिल्ली चाट, कबाब, बिर्याणी, इटालियन, मॅक्सिकन, पंजाबी, अफगाणी असा आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील सुपर मेन्यू होता. जेवण बनवण्यासाठी दिल्ली
आणि लखनऊमधील खास शेफ बोलवण्यात आले होते.
संबंधित बातम्या
Alia Ranbir Wedding : Just Married आलिया-रणबीरची पहिली झलक; 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद
Alia Ranbir Wedding Photo : नांदा सौख्यभरे! आलिया-रणबीरचा लग्नातही दिसला रोमॅंटिक अंदाज
Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर; कोट्यवधींमध्ये विकले राइट्स
Alia Ranbir Wedding Video : Alia Bhatt आणि Ranbir Kapoor यांचा विवाहसोहळा संपन्न
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)