Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर; कोट्यवधींमध्ये विकले राइट्स
Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
![Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर; कोट्यवधींमध्ये विकले राइट्स Watch Alia Ranbir royal wedding on Ott Rights sold in the billions Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरचा शाही विवाहसोहळा पाहा ओटीटीवर; कोट्यवधींमध्ये विकले राइट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/2b12e2c09a7dd0365c08f3be7cc8ce72_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचा लग्नसोहळा पार पडला असला तरी अद्याप लग्नसोहळ्यातील दोघांचा एकही फोटो समोर आलेला नाही. आलिया-रणबीरप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांसाठीदेखील आजचा दिवस खास आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांचा लग्नसोहळा ओटीटीवर पाहता येणार आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी कडक सुरक्षा करण्यात आली होती. खास पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ स्ट्रीम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फुटेज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह केले जाणार आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे हक्क तब्बल 90-110 कोटींत विकत घेतले आहेत.
View this post on Instagram
आलिया-रणबीरने वास्तूमध्ये सात फेरे घेतले आहेत. त्यामुळे चाहते आता त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओची प्रतीक्षा करत आहेत. रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. सध्या आलिया आणि रणबीरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.
संबंधित बातम्या
Alia Ranbir Wedding : सात जन्माची ही साथ... आलिया-रणबीरचा विवाहसोहळा संपन्न
Alia Ranbir Wedding : नववधूच्या वेशात दुसऱ्यांदा आलियाची पाठवणी करणार सोनी राझदान! पहिल्या ‘विदाई’बद्दल माहितेय का?
Alia Ranbir Wedding : 'ऋषी कपूर यांची इच्छा पूर्ण होत आहे'; आलिया आणि रणबीर यांच्या लग्नावर राकेश रोशन यांची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)