Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
संविधान रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला.
Rahul Gandhi : नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे, पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकामं वाटतं. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची विचारसरणी, बुद्धांची फुले, आंबेडकरांची विचारसरणी आहे. गांधींच्या विचाराचा हा भारत आहे. ते पोकळ नाही, भारताचे ज्ञान, भारताचा आत्मा आहे आणि ते संविधान रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि रंगावरून बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला.
राहुल गांधी या सभेतून आरक्षण, जातीय जनगणना, संविधान, महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आलेले उद्योग आदी मुद्यांवरून भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. संविधानाचा रंग आणि ते रिकामं असल्याचा आरोप करणाऱ्या पीएम मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. कोणत्याही परिस्थितीत जातीय जणगणना करणार असल्याचे ते म्हणाले.
संविधानाचा रंग कोणता आहे, ते निळे आहे, ते लाल आहे याने आम्हाला फरक पडत नाही, आम्ही त्यामध्ये काय लिहिले आहे ते संरक्षित करतो. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहोत, असे राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी नंदुरबार आदिवासी अस्मितेला हात घालत त्यांना वनवासी संबोधित करण्यावरूनही हल्लाबोल केला. आपले हक्क भाजप हिरावून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल यांनी सत्तेत आल्यास दिल्लीत काँग्रेस आणि महाराष्ट्रात येथील सरकार 50 टक्क्यांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत उखडून टाकेला आणि आरक्षणाची मर्यादा वाढवेल, असा विश्वास दिला. ते म्हणाले की, महिलांसाठी सत्तेत येताच 3 हजार खटाखट खात्यात टाकणार आहोत. कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी महिलांना मोफत प्रवास असेल. बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत 4 हजार रुपये, तसेच 25 लाखांचा विमा उतरवरणार असल्याचे सांगितले.
राहुल यांनी राज्यातील उद्योगांवरूनही महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील 5 लाख उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आल्याने येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं.
इतर महत्वाच्या बातम्या