Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Supriya Sule on Devendra Fadnavis : चांदवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांच्या प्रचार सभेतून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नाशिक : देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी, गडकरी चांगले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील, असे वाटले होते. मात्र देवाभाऊ कॉपी करून पास झाले, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला. चांदवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाजार समितीची मोठी इमारत आहे. मात्र, त्या मागचे अश्रु केंद्र सरकारला दिसत नाही. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक आले. पण, भाव मिळत नाही. 7 ते 10 हजार क्विंटल भाव महाविकास आघाडीचे सरकार देणार आहे. मला एका माणसाचा परदेशातून फोन येतो, ताई मशीनमध्ये गडबड आहे. मी त्याला म्हटले मी मशीनमधूनच निवडून आले, पण काही मशीनमध्ये गडबड आहे, असे मी म्हणत नाही, त्या व्यक्तीचे मत आहे, असे त्यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
देवेंद्रजींना आता देवभाऊ म्हणतात, त्यांचे नाव आता बदलले. मी आलो दोन पक्ष फोडून आलो, असे ते म्हणतात. देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी, गडकरी चांगले आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगले असतील, असे वाटले होते. मात्र देवाभाऊ कॉपी करून पास झाले, दोन पक्ष फोडून पास झाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मी राज्यातील सर्वात लाडकी बहीण
साताऱ्याला पिपाणी चिन्ह नसते तर शशिकांत शिंदे निवडून आले असते, असे त्यांचे नेते म्हणतात. या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही दणका दिला. लगेच लाडकी बहीण योजना काढली. त्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही, पैशाने सर्व खरेदी करता येत नाही. एका पत्रकाराने नाशिकवर बॉम्ब टाकला. त्याने पुस्तकात लिहिले की, ईडीच्या भीतीने पक्षात प्रवेश केला, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
नाशिककरांनी चांगलाच दणका दिला
काल पवार साहेबांनी 7 सभा घेतल्या. मी रात्री त्यांच्याशी भांडण केले, आवाज चढविला पण ते म्हणाले गप्प बस... पवार साहेब सत्तेत येणार आहेत का? ते कशासाठी करतात? ते थोडीच सरकारमध्ये बसणार आहेत? चांगले सरकार येणार म्हणून ते फिरत आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, कांद्यावर 40 टक्के टॅक्स लावला. पाकिस्तानमध्ये कांद्याला टॅक्स नाही. पाकिस्तानचा कांदा जगभर गेला. पण, आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला टॅक्स लावला जातो. मी पीयूष गोयल यांच्याशी भांडण केले. नाशिककरांनी चांगलाच दणका दिला, भाजपचा सुपडा साफ केला, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.
आपले सरकार दहा दिवसांत येणार
धनंजय महाडिक इकडे होते ते चांगले होते. पण आता ते महिलांना दम देतात. कोणत्याही महिलेचा फोटो काढणे गुन्हा आहे. मला देवभाऊंना विचारायचे आहे. तुमचे नेते महिलांना धमकी देतात आणि तुम्ही गप्प बसतात, असा गृहमंत्री आपल्याला पाहिजे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नाती पैशाने विकत घेता येत नाही. नाती जोडायला ताकद लागते. माझं भाषण ऐका, देवाभाऊ आले तर त्यांचेही भाषण ऐका. विरोधक दिलदार पाहिजे. आपले सरकार दहा दिवसांत येणार आहे. त्यानंतर आम्ही आपले प्रश्न सोडवू, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा