Alia Bhatt : प्रेग्नंट असल्यामुळे आलिया भट्ट दिवाळी साजरी करत नाही? फोटो शेअर करत केला खुलासा
Alia Bhatt On Diwali: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यंदाची दिवाळी तितक्या धुमधडाक्यात साजरी करु शकली नाही.
मुंबई: आलिया आणि रणबीरसाठी यंदाची दिवाळी विशेष आहे, खासकरून आलिया भट्ट साठी. कारण या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत, पण आलिया भट्टचा गंगूबाई कठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) आणि ब्रह्मास्त्र (Brahmāstra) या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जादू केली. तसेच पहिल्यांदाच आलियाने रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित काम केलं. आलिया आणि रणबीरसाठी यंदाचं वर्ष आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे. ते म्हणजे त्यांच्या घरी आता लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणूनच आलिया यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरी करू शकत नाही. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.
आलियाने गेल्या वर्षीचा एक फोटो शेअर करत म्हटलंय की, सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा, मी बेड रेस्टवर असल्याने यंदाची दिवाळी साजरी करु शकत नाही.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 7.19 कोटी फॉलोअर्स आहेत.
आलिया-रणबीरच्या घरी येणार पाहुणा
आलिया या वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने गोड बातमी दिली होती. आलियाने सोनोग्राफी टेस्ट दरम्यानचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत लिहिलं होतं,"आमचं बाळ लवकरच येत आहे".
बाळाच्या जन्मानंतर आलिया घेणार ब्रेक
बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
आलियाचे आगामी सिनेमे
आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने सिनेमागृहाच चांगलाच धुमाकूळ घातला. आता आलिया-रणबीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.