एक्स्प्लोर
माझ्या बायोपिकसाठी आलिया भट्ट योग्य, पण एक गोष्ट तिला शिकावी लागेल : माधुरी दीक्षित
भविष्यात जर माझा बायोपिक बनवण्याचा विचार झाला तर त्यामध्ये आलिया भट्टने माझी भूमिका साकारावी, असे मत बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे.
मुंबई : भविष्यात जर माझा बायोपिक बनवण्याचा विचार झाला तर त्यामध्ये आलिया भट्टने माझी भूमिका साकारावी, असे मत बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे. परंतु माझ्या बायोपिकसाठी आलियाला तिच्या नृत्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. असेही मधुरी म्हणाली.
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्सचा ट्रेण्ड सुरु आहे. एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देत असताना माधुरी दीक्षितला तिच्या बायोपिकमध्ये कोणाला पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तिने आलियाचे नाव घेतले.
माधुरी म्हणाली की, माझ्या बायोपिकमध्ये मला आलियाला पाहायला आवडेल. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. गल्ली बॉय, हायवे, राजी या चित्रपटातील तिच्या अभिनयाने मी खूप प्रभावित झाले आहे. आलिया माझ्या बायोपिकसाठी परफेक्ट असली तरी तिला थोडे कथ्थक शिकावे लागेल. ती चांगलं नृत्य करते. पण माझ्या बायोपिकसाठी तिला नृत्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट दोघीही करण जोहरच्या आगामी कलंक या चित्रपटात एकत्र दिणार आहेत. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी जगभर प्रदर्शित होणार असून यामध्ये आलिया-माधुरीसह संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
View this post on Instagram#womenofkalank Roop, Bahaar Begum, Satya. @aliaabhatt @madhuridixitnene
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement