Alanna Panday gender reveal video : अलानाला मुलगा होणार की मुलगी? अनन्या पांडेच्या बहिणीकडून जन्मापूर्वीच जेंडर रिवील; नेटकरी संतापत म्हणाले...
Alanna Panday gender reveal video : अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना हिच्या प्रेग्नंसीची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अलाना एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये.
Alanna Panday gender reveal video : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहीण, यूट्यूबर अलाना पांडे (Alanna Panday) आणि फोटोग्राफर इव्होर मॅकक्रे यांनी नुकतच त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन प्रेग्नंसीबाबत सांगितलं. पुन्हा एकदा अलानाने एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांना मुलागा होणार की मुलगी हे त्यांनी सांगितंल आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात या दोघांनी मुंबईत लग्न केलं. सध्या हे दोघेही अमेरिकेत राहतात. पण तिने बाळाच्या जन्मापूर्वीच बाळाचे जेंडर रिव्हिल्ह केल्यामुळे चाहते तिच्यावर नेटकरी तिच्यावर संतापलेत.
अलानाने बुधवारी तिच्या इंस्टाग्रामवर इव्होरसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये त्या दोघांनाही व्हाईट कलरचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतंय. तसेच त्यांच्या या फोटोशूटमध्ये व्हाईट कलरचा एक केकही आहे,ज्यावर बेबी असं लिहिलंय. जेव्हा अलाना आणि इव्होरने तो केक आपल्या ग्लासमध्ये घेतला तेव्हा त्यामध्ये ब्लू करल दिसला. दरम्यान ब्लू करल आल्यास मुलगा असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अलाना आणि इव्होरने लग्नाआधीच त्यांच्या बाळाचे जेंडर रिवीव्ह केल्यानं नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले असल्याचं पाहायला मिळत आहे.
अलानाने सांगितलं की मुलगा होणार की मुलगी!
याआधी अलानाने तिच्या बाळाचे जेंडर रिव्हिल करणार असल्याचे फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये ब्लू आणि पिंक बलून्स तसेच कुशन आणि टेडी बियर देखील पाहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वी तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले, 'जेंडर रिव्हल पिकनिक. तुम्हाला काय वाटतं की मुलगा असेल की मुलगी? तिच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट्स करत नापसंती दर्शवली होती.
View this post on Instagram
अलानावर नेटकरी संतापले
जेव्हा अलानाने त्यांचे ब्लू फोटो शेअर केले तेव्हा स्पष्ट झालं की अलानाला मुलगा होणार आहे. दरम्यान बाळाच्या जन्मापूर्वी त्याचे जेंडर रिवील्ह केल्यामुळे नेटकरी अलानावर संतापल्याचं पाहायला मिळालं. यावर लोकांनी प्रतिक्रिया देत हे चुकीचं असल्याचं म्हटलं. दरम्यान हे उघडपणे सांगणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचंही अनेकांनी म्हटलं. काहींनी हे त्यांनी जाहीर केल्यामुळे त्यांना अटक करा असंही म्हटलं आहे. तसेच अनेकांनी त्यांचे अभिनंदन देखील केलंय.
View this post on Instagram