एक्स्प्लोर

Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..

Akshay Kumar Helps Punjabi Singer Family : अभिनेता अक्षय कुमारने प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.

Akshay Kumar Helps Punjabi Singer Family : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या दिलदार स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमारने पुन्हा एकदा गरजूंना मदतीला धावून गेला आहे. अक्षयने प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने प्रसिद्ध पंजाबी गायक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते दिवंगत गुरमीत बावा (Punjabi Singer Gurmeet Bawa) यांची मुलगी ग्लोरी बावा (Galori Bawa) यांना आर्थिक मदत केली आहे. दिवंगत गुरमीत बावा यांची मुलगी ग्लोरी बावा आर्थिक संकटातून जात होती. त्यांनी आर्थिक समस्या सोशल मीडियावर शेअर करताना सरकारकडे मदतीची मागणीही केली होती.

अक्षय कुमारचा मदतीचा हात

दिवंगत गुरमीत बावा यांची मुलगी ग्लोरी बावा हिने सरकारकडे मदत मागितल्यानंतर आणि सोशल मीडियावर तिची आर्थिक समस्या शेअर केल्यानंतर, अभिनेता अक्षय कुमारने शनिवारी तिला या संकटातून बाहेर पडण्यासाठी 25 लाख रुपये पाठवले. या कठीण परिस्थितीत त्यांना आर्थिक मदत करून या अभिनेत्याने स्वत:ला खरा खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच वेळी, या मदतीनंतर, ग्लोरीने अभिनेत्याच्या या उदारतेबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या.

प्रसिद्ध गायिकेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ग्लोरी बावाला अक्षय कुमारने मदत केली आहे. दिवंगत प्रसिद्ध पंजाबी गायिका गुरमीत बावा यांची मुलगी ग्लोरी बावा हिला अक्षय कुमारने 25 लाख रुपये पाठवले आहेत. दिवंगत गुरमीत बावा यांची मुलगी ग्लोरी बावा केवळ पंजाबमध्येच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ग्लोरी बावा आणि त्यांचे कुटुंबीय दीर्घकाळ आर्थिक संकटात आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेचा ताबा भाडेकरूने घेतल्याने त्या संकटात सापडल्या होत्या.

ग्लोरी बावा आर्थिक संकटात

आई गुरमीत बावा आणि लची बावा यांच्या निधनानंतर ग्लोरी बावा आर्थिक संकटातून जात होत्या. चार मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी मीडियामध्ये मदतीची हाक दिली होतू. ही बातमी मीडियामध्ये आल्यानंतर अक्षय कुमार त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. अमृतसरमध्ये राहणाऱ्या ग्लोरी बावा यांना अचानक फोन आला की, अक्षय कुमारने त्यांना 25 लाखांची मदत पाठवली आहे. ग्लोरी बावाने अक्षय कुमारचे आभार मानले आहेत आणि राखीच्या सणाला ती आपल्या भावाला राखी बांधायला जाणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

ग्लोरी बावा काय म्हणाल्या?

अक्षय कुमारकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर ग्लोरी बावा म्हणाल्या की, 'माझ्यासाठी याचा अर्थ काय आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. भावाने केलेल्या कृतीमुळे मी भारावून गेली आहे. कुमारने याला मदत म्हणण्यास नकार दिला, पण एक भाऊ त्याच्या बहिणीसाठी करतो, ते त्याने केलं आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच मदत होईल. मला कामाची गरज आहे आणि मी ते मागत आहे. लोकांनी माझ्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे आणि मला आशा आहे की, आमच्यासारख्या कलाकारांना काहीतरी अर्थपूर्ण काम मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Munjya : वडिलांचा मृत्यू, घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला; 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याची संघर्षगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Pohradevi : पारंपारिक वेष धारण करून बंजारा समाजातील महिला मोदींचं स्वागत करणारMaharashtra NIA ATS Raid : एनआयए आणि एटीएसचे संभाजीनगर,जालना आणि मालेगावमध्ये छापेNarendra Modi Mumbai Metro 3 Line : मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी पहिला टप्पा आज सुरु होणारNIA Maharashtra Raid : एनआयएचे महाराष्ट्रासह 5 राज्यांतल्या 22 ठिकाणांवर छापे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chaitanya Maharaj Wadekar: चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
चैतन्य महाराज वाडेकर अटक प्रकरणात महत्त्वाची अपडेट, बुवांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...
Ahmednagar News : भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
भाजपच्या विद्यमान आमदारांवर पक्षाच्याच नेत्याचा गंभीर आरोप, विधानसभेच्या तोंडावर अहमदनगरमध्ये राजकीय गरमागरमी
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
Insurance Claim : कोणत्या कारणामुळं तुमचा विमा फेटाळला जावू शकतो? 'या' 5 चुका टाळा, आरोग्य विमा मिळवा
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तीस तास उलटून आरोपी मोकाट; संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
पुण्यात 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार, कोंढव्यातील धक्कादायक घटना
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Embed widget