एक्स्प्लोर

Natya Parishad : नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचीही उडी; प्रसाद कांबळींना शेलारांचा तर प्रशांत दामलेंना सामंतांचा पाठिंबा

Natya Parishad : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रसाद कांबळींना (Prasad Kambli) आशिष शेलारांचा (Ashish Shelar) तर प्रशांत दामलेंना (Prashant Damle) उदय सामंतांचा (Uday Samant) पाठिंबा मिळत आहे.

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad Latest Update : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नुकतीच पार पडली असून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 मे 2023 रोजी नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. आता या निवडणुकीत भाजपनेही (BJP) उडी घेतली आहे. 

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena) सामना रंगणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रसाद प्रसाद कांबळींना (Prasad Kambli) भाजप नेते आशिष शेलारांचा (Ashish Shelar) तर प्रशांत दामलेंना (Prashant Damle) उद्योगमंत्री उदय सामंत यांचा (Uday Samant) पाठिंबा मिळत आहे. 

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीतही राजकारण रंगू लागलं...

नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक जवळ आल्याने आता या निवडणूकीत राजकारणदेखील रंगू लागलं आहे. प्रशांत दामलेंनी अध्यक्षपद सोडून इतर पदांवर उभे केलेले उमेदवार हे इतर पक्षाशी नाळ असणारी मंडळी आहेत. प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल'ला उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पाठिंबा मिळत आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रशांत दामले यांच्या पॅनलसाठी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचीदेखील (Sharad Pawar) भेट घेतली आहे. 

प्रसाद कांबळींच्या 'आपलं पॅनल'ला आता भाजप नेते आशिष शेलार यांचा पाठिंबा मिळत आहे. प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि रंगभूमीशी जवळीक असणारी मंडळी आहेत. मराठी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आणि रंगभूमी आणि रंगकर्मींचा विकास होण्यासाठी राजकारणविरहीत वातावरण आणि चांगल्या माणसांची आवश्यकता असल्याने मी प्रसाद कांबळींना मराठी रंगभूमीचा एक चाहता म्हणून आपला पाठिंबा दर्शवतो आहे. भाजप हा पक्ष नेहमीच प्रत्येक गोष्टीत चांगल्या माणसांच्या पाठी नेहमीच भक्कम उभा राहतो त्यामुळे आपण प्रसाद कांबळी आणि त्याच्या पॅनलला साथ देत आहोत, अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

प्रसाद कांबळी की प्रशांत दामले? अध्यक्षपदासाठी चुरस

नाट्यपरिषदेवर महाराष्ट्रभरातून निवडून आलेले 60 सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली 'आपलं पॅनल' मैदानात आहेत तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली 'रंगकर्मी नाटक समूह पॅनल' मैदानात आहे. प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. 16 मे रोजी संध्याकाळपर्यंत अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे समोर येईल. 

संबंधित बातम्या

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरुन राजकीय अंक; अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि उदय सामंत यांची युती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget