Ajay Devgn : अजय देवगण नाही... तर 'हे' आहे बॉलिवूडच्या सिंघमचं खरं नाव; पण का बदललं नाव?
Ajay Devgn : 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या अभिनयाला आणि हटके स्टाइलला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.
Ajay Devgn Father Changed His Son Real Name : प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष पूर्ण केली आहे. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे (Phool Aur Kaante)या चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या अभिनयाला आणि हटके स्टाइलला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अजयचे नाव हे त्याच्या वडीलांनी बदलले आहे हे अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात अजयच्या नावाबद्दल
अजयच्या वडीलांनी बदलले होते नाव
अजय देवगणचे खरे नाव अजय नाही तर विशाल आहे. 2009 मधील एका मुलाखतीमध्ये अजयने त्याचे नाव वडीलांनी बदलले असे सांगितले होते. बॉलिवूडमध्ये जेव्हा त्याने पदार्पण केले तेव्हा विशाल नावाच्या 3 मुलांनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे त्याच्या वडीलांना त्याचे नाव बदलावे लागले. अजयचे मित्र त्याला वीडी (विशाल देवगन) असं म्हणत, असे अजयने मुलाखतीमध्ये सांगितले होते. गोलमाल अगेन, टोटल धमाल, सिंघम रिटर्न्स , सिंघम, गोलमाल 3,बोल बच्चन,सन ऑफ सरदार,रेड, शिवाय या अजयच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
View this post on Instagram
अजय आणि काजेलच्या रोमँटिक केमिस्ट्रीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते. 1999 मध्ये काजोल आणि अजयने लग्नगाठ बांधली. त्यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.
Aamir Khan Third Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार?