Aishwarya Rai Upcoming Films : ऐश्वर्या राय बच्चनचं कमबॅक, बिग बजेट सिनेमांत झळकणार
Aishwarya Rai Movies : ऐश्वर्या राय बच्चन आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 2022 मध्ये ऐश्वर्याचे अनेक बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Aishwarya Rai Bachchan Upcoming Project In 2022 : पनामा पेपर्स लीक प्रकरणी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) काल ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली होती. ऐश्वर्या राय बच्चनची ईडीने फेमा (FEMA) च्या तरतुदीनुसार म्हणजेच परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार जबाब नोंदवला आहे. दरम्यान 2022 मध्ये ऐश्वर्याचे अनेक बडे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सुमारे सहा तास ऐश्वर्याची चौकशी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार ऐश्वर्याने पनामा पेपर्स लीक प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रेदेखील तपासकर्त्यांसमोर सादर केली आहेत. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आहे. तर 2022 मध्ये ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चनचे आगामी सिनेमे
ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन रावण सिनेमाचे दिग्दर्शक मणी रत्नम यांनी केले आहे. पोन्नियिन सेलवन (Ponniyin Selvan) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाद्वारे ऐश्वर्या कमबॅक करणार आहे. हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. कौन थी रिमेक (Woh Kaun Thi Remake) या सिनेमाच्या माध्यमातूनदेखील ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात ती साधनाची भूमिका साकारणार आहे. शाहिद कपूरदेखील या सिनेमात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वो कौन थी च्या रिमेकनंतर ऐश्वर्या रात और दिन सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ऐश्वर्या सुजॉय घोषच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत सैफ अली खानदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा गुलाब-जामुन (Gulab Jamun) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) केले आहे.
संबंधित बातम्या
Aishwarya Rai ED Summoned : पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय-बच्चनची ईडीकडून तब्बल सहा तास चौकशी
Bollywood Weddings In 2022 : मलायका- अर्जून ते आलिया-रणबीर; हे सेलिब्रिटी 2022 मध्ये अडकणार लग्नबंधनात?
Katrina Kaif : लग्नानंतर कतरिना कैफ करणार आता 'Tiger 3' चे शूटिंग पूर्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha