(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' कृतीने घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : सिनेइंडस्ट्रीत अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या वैवाहिक नात्यांबाबत विविध चर्चा सुरू आहेत. या दोघांमधील नातं आता अतिशय नाजूक वळणावर असल्याची चर्चा आहे. सिनेइंडस्ट्रीत या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासोबत राहत असून तिने अभिषेकचे घर सोडलं आहे. ऐश्वर्या ही अभिषेक किंवा बच्चन कुटुंबांसोबतही एकत्रितपणे दिसत नाही. अभिषेक फक्त बच्चन कुटुंबासोबत दिसतो, तर त्याची मुलगी आराध्या ऐश्वर्यासोबत राहते. ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दुबईला गेली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐश्वर्याने वेडिंग रिंग घातली नसल्याचे दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दुबईचा आहे. जिथे ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत SIIMA अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचे आयोजक तिचे स्वागत करताना दिसत आहेत. एका चाहत्याने ऐश्वर्यासाठी फुलांचा गुच्छ आणला आहे. ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे पण तिने वेडिंग रिंग घातली नसल्याचे दिसत आहे. ही बाब नेटकऱ्यांनी वेधून घेतली आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी, ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाच्या जलसा बंगल्यात आराध्यासह गेली होती. त्यावेळी चर्चांना उधाण आले होते.
अभिषेकनेही उतरवली आहे वेडिंग रिंग...
ऐश्वर्यापूर्वी, जेव्हा अभिषेकला अनेकदा स्पॉट केले गेले होते, तेव्हा त्यानेही वेडिंग रिंग घातली नसल्याचे समोर आले होते. चाहत्यांनी याकडे लक्ष वेधले होते. अभिषेकचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मागील अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. या जोडप्याच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. अनंत-राधिका अंबानीच्या लग्नाला अभिषेक हा त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. तर, ऐश्वर्या ही नंतर मुलगी आराध्यासोबत आली. या दोघांच्या वेगवेगळ्या एंट्रीने चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर अभिषेकने घटस्फोटाशी संबंधित एक पोस्ट लाइक केली होती.