(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aishwarya : ना सोबत लेक , ना नवरा, ऐश्वर्या एकटीच गेली अमेरिकेत फिरायला; बच्चन कुटुंबियांच्या सुनेच्या व्हायरल फोटोंनी चर्चांना पुन्हा उधाण
Aishwarya Rai Is In New York For Holidays: घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच ऐश्वर्या एकटीच अमेरिकेत फिरायला गेली असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत.
Aishwarya Rai Is In New York For Holidays: सोशल मिडिया, माध्यमांमध्ये सध्या एका बातमीची तुफान चर्चा सुरु आहे. अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना चांगलच उधाण आलं आहे. त्यातच आता ऐश्वर्या एकटीच अमेरिकेत फिरायला गेली असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या ऐश्वर्या ही तिच्या कामापेक्षा, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली आहे. तिचा आणि अभिषेकचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा जरी सुरु असल्या तरीही यावर अद्याप कुणीही भाष्य केलं नाहीये. पण या सगळ्यात ऐश्वर्या मात्र एकटीच अमेरिकेत फिरायला गेली असल्याची माहिती सध्या समोर आलीये. अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चनशिवाय ती न्यूयॉर्कला पोहोचली असून तिथे एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेत पोहचली ऐश्वर्या
जेव्हापासून अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केली तेव्हापासून त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच ऐश्वर्याचे सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या राय आणि पॉडकास्टर जेरी रेना यांनी ऐश्वर्या रायसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याआधीही जेरी ऐश्वर्या रायला भेटली होती. ऐश्वर्या रायच्या लूकमध्ये खूप बदल झाल्याचे फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून येते. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
नुकतेच राधिका आणि अनंतच्या लग्नात ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब दिसले होते. अभिषेक बच्चनने आपल्या कुटुंबासह वेगळी एंट्री घेतली होती, तर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांनी लग्नाला स्वतंत्रपणे हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. मात्र, यानंतर आणखी एक फोटो समोर आला, ज्यामध्ये ऐश्वर्या अभिषेकसोबत बसलेली दिसत आहे. आता त्यांच्या घटस्फोटाच्या दाव्यात किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.