(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे वहिनीचे टोमणे; अभिषेकसोबतच्या नात्यासोबतच आता भावजयीसोबतच्या नात्यामुळे ऐश्वर्या चर्चेत
Aishwarya Rai Bachchan Sister in Law Shrima Rai: काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याबाबत तिच्या वहिनीनं एक विचित्र कमेंट केली होती. सध्या तिचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Shrima Rai On Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishekh Bachchan) सध्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं? याबाबत इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. अशातच ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याबाबत तिच्या वहिनीनं एक विचित्र कमेंट केली होती. सध्या तिचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी श्रीमा राय हिनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऐश्वर्याबाबत एक विचित्र कमेंट केली होती. ज्याचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. एका नेटकऱ्यानं श्रीमाला ऐश्वर्याचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याबाबत विचारलं होतं. त्यावर श्रीमानं दिलेल्या उत्तरानं सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं.
श्रीमा रायनं एकही फोटो शेअर केलेला नाही
श्रीमा राय हिनं मे महिन्यात एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिचा पती आणि ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय आणि त्यांची दोन मुलं, तसेच, अभिनेत्रीची आई बिंद्रा राय एकत्र दिसत होते. मग एका नेटकऱ्यानं निदर्शनास आणून दिलं की, श्रीमानं कधीही तिच्या पेजवर ऐश्वर्या रायसोबतचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही आणि तिनं तिचा ऑनलाईन उल्लेखही केला नाही. युजरनं लिहिले की, "तुम्ही ऐश्वर्या किंवा आराध्याचा एकही फोटो शेअर केलेला नाही."
Shrima Rai नं नणंदेबाबत केलं मोठं वक्तव्य
श्रीमा रायनं कमेंट करत म्हटलं की, "तुम्ही त्यांचे सर्व फोटो पाहण्यासाठी त्यांच्या पेजवर जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांचेच फोटो पाहायला मिळतील. त्यामध्ये आमचा एकही फोटो नसेल, यामुळे तुम्ही नक्कीच संतुष्ट व्हायला पाहिजे..."
Aishwarya Rai नं शेअर केले वहिनीचे फोटो
श्रीमाच्या कमेंटवर त्यावेळी कुणाचं लक्ष गेलं नाही, तरी चाहत्यांना अलीकडेच याची माहिती मिळाली आणि त्याचे स्क्रीनशॉट आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी असंही निदर्शनास आणून दिलं की, श्रीमाच्या दाव्याच्या विरोधात, ऐश्वर्यानं 2019 मध्ये आदित्य आणि तिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्याला 'फॅमिली टाईम' असं कॅप्शन दिलं होतं.
ऐश्वर्या आणि अभिषेकचा खरंच घटस्फोट होणार?
ऐश्वर्या गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. दसवीच्या शूटिंगदरम्यान अभिषेकचं अभिनेत्री निम्रत कौरसोबत सूत जुळल्याचा दावा सातत्यानं सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळेच ऐश्वर्यानं अभिषेकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही गेल्या काही महिन्यांत एकमेकांबद्दल बोलणं टाळलं आहे, त्यादरम्या झालेल्या अनेक इव्हेंट्समध्ये ते दोघेही वेगळे दिसले, त्यामुळे चर्चांना आणखी ऊत आला. दरम्यान, याबाबत अद्याप ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन आणि राय कुटुंबानं अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :