Sonu Nigam: सोनू निगम धक्काबुक्की प्रकरण: स्वप्नील फातर्पेकर यांच्या बहिणींची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणावर स्वप्नील यांची बहीण सुप्रदा फातर्फेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sonu Nigam: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यानं स्वप्नील फातर्फेकर यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert) धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, सोनूनं स्वप्नील फातर्फेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. आता या प्रकरणावर स्वप्नील फातर्फेकर यांची बहीण सुप्रदा फातर्फेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रदा फातर्फेकर यांनी ट्वीट शेअर करुन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'चेंबूर महोत्सवाचे आयोजक या नात्याने, मला चेंबूर महोत्सव 2023 च्या शेवटी झालेल्या घटनेबद्दल सांगायचं आहे. सोनू निगमला त्यांचा परफॉर्मन्स देऊन घाईघाईने स्टेजवरून खाली आणले जात होते. माझा भाऊ हा सोनूसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. गर्दी आणि गोंधळामुळे वाद निर्माण झाला. पडलेल्या व्यक्तीला झेन रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याची तपासणी झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले.'
'सोनू निगम सुखरूप आहे. संस्थेच्या टीमच्या वतीने, आम्ही सोनू सर आणि त्यांच्या टीमची या घटनेबद्दल अधिकृतपणे माफी मागितली आहे. कोणत्याही निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका'
As organiser of the Chembur festival, I wish to shed light on some facts about the unfortunate incident that occurred at the end of Chembur Festival 2023.
— Suprada Phaterpekar (@suprada17) February 20, 2023
While Shri Sonu Nigam was being hurriedly ushered off the stage after delivering his performance ( 1/3 )
my brother was trying to take a selfie with him. Due to the rush & furore, there was a commotion that ensued. The person who fell was taken to Zen hospital & was discharged after examination ( 2/3 )
— Suprada Phaterpekar (@suprada17) February 20, 2023
Shri Sonu Nigam is unhurt. On behalf of the organisation team, we have officially apologised to Sonu sir & his team for the unpleasant incident.
— Suprada Phaterpekar (@suprada17) February 20, 2023
Please donot believe any baseless rumours and those who are trying to politicize the matter. ( 3/3 )
ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'माझ्या भावाला सोनू निगमसोबत सेल्फी काढायचा होता. तो सेल्फी काढत असताना सोनू निगमच्या बॉडीगार्डसोबत त्याचा वाद झाला. आम्ही नंतर सोनू निगमचीही माफी मागितली. हाणामारीत एक व्यक्ती स्टेजवरून खाली पडला. आम्ही त्याला रुग्णालयात नेले आणि त्यानंतर सोनू निगम पोलिसांकडे गेला. यात राजकारण करण्यासारखे काही नाही. माझा भाऊ पोलिसांना सहकार्य करेल.'
My brother wanted to click a selfie with Sonu Nigam, & when he was doing so, there was a dispute b/w him & Sonu Nigam's bodyguard. It was just a fan moment gone wrong. We later apologized to Sonu Nigam as well: Suprada Phaterpekar, sister of Swapnil Phaterpekar https://t.co/aMmqHN83lK pic.twitter.com/7UccAo6VbO
— ANI (@ANI) February 21, 2023
सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदाराचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केली अशी माहिती समोर आली.
संबंधित बातम्या