एक्स्प्लोर

Adipurush New Release Date : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची रिलीज डेट ढकलली पुढे; निर्मात्यांनी दिली माहिती

Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Adipurush New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाचा टीझर आऊट झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती देत एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे, 'आदिपुरुष' हा फक्त सिनेमा नाही तर श्रीरामावरील आपल्या भक्तीचे, इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव मिळणार आहे. पण त्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. 'आदिपुरुष' हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भारतीयांना नक्कीच अभिमान वाटेल. तुमचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही असेच राहुदेत". 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर सातत्याने टीका होत आहे. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला आहे. तसेच हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 'आदिपुरुष'  या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. 

'आदिपुरुष' हा सिनेमा आता 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील सिनेमा आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Adipurush : आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतने सोडलं मौन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Embed widget