एक्स्प्लोर

Adan Canto passes away: 'द क्लीनिंग लेडी' फेम अभिनेत्याचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Adan Canto passes away: अभिनेता एडन कॅन्टो (Adan Canto) याचं निधनं झालं आहे. एडननं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Adan Canto passes away:  हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता एडन कॅन्टो (Adan Canto) याचं निधनं झालं आहे. एडन कॅन्टोच्या निधनानं हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एडननं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, अपेंडिसियल कॅन्सरमुळे एडन कॅन्टोचा मृत्यू झाला. एडन कॅन्टोच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचे चाहते  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

'द क्लीनिंग लेडी' मुळे मिळाली लोकप्रियता

एडननं 'द क्लीनिंग लेडी'  या ड्रामा सीरिजमध्ये काम केले. एडनने या अमेरिकन सीरिजमध्ये मुख्य भूमिका केली होती. तो या सीरिजमध्ये अरमान मोरालेसच्या भूमिकेत दिसला होता. एडन या सीरिजच्या दोन सीझनमध्ये देखील दिसला होता. पण तब्येतीच्या समस्येमुळे तो या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा भाग होऊ शकला नाही. 'द क्लीनिंग लेडी'  या ड्रामा सीरिजमुळे एडनला लोकप्रियता मिळाली.

कॅन्सरशी झुंज अपयशी

एडन कॅन्टो हा गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाचा सामना करत होता. पण 8 जानेवारी रोजी त्यानं जगाचा निरोप घेतला.एडान कॅन्टो यांच्या पश्चात पत्नी स्टेफनी अॅन कॅन्टो आणि रोमन एल्डर आणि इव्ह जोसेफिन ही दोन मुले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adan Canto (@adancanto)

एडननं  'या' सीरिजमध्ये केलं काम

1981 मध्ये मेक्सिको येथे जन्मलेल्या आणि टेक्सासमध्ये वाढलेल्या एडनने वयाच्या 16 व्या वर्षी मेक्सिको सिटीमध्ये गायक आणि गिटार वादक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानं  जाहिराती आणि टीव्ही शोमध्ये देखील काम केलं. 2013 मधील फॉक्स ड्रामा सीरिज 'द फॉलोइंग' मध्ये काम करण्याची संधी एडनला मिळाली.

एडन कॅन्टोने 'डिझाइनेटेड सर्व्हायव्हर', 'मिक्सोलॉजी' आणि 'ब्लड अँड ऑइल' या  सीरिजमध्ये काम केलं. तसेच नेटफ्लिक्सच्या 'नार्कोस' या सीरिजमध्ये देखील त्यानं महत्वाची भूमिका साकारली.

एडन कॅन्टोने डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर सारख्या मालिकेतही काम केले,  मिक्सोलॉजी आणि ब्लड अँड ऑइलमधील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

एडन कॅन्टोने 2014 मध्ये एका लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले.  2020 मध्ये  त्याने थिओ रॉसीचा एक चित्रपट दिग्दर्शित केला.

संबंधित बातम्या:

Rashid Khan Demise: प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे निधन; वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget