The Kerala Story: 'प्रपोगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही', नेटकऱ्याचं ट्वीट; अदा शर्माच्या रिप्लायनं वेधलं लक्ष
एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्या नेटकऱ्याच्या ट्वीटला अदा शर्मानं (Adah Sharma) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अनेक लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा फिल्म' म्हणत आहेत. आता एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्या नेटकऱ्याच्या ट्वीटला अदा शर्मानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्याचं ट्वीट
एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन द केरळ स्टोरी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, प्रपोगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर कमवू शकत नाही.' या ट्वीटला अदानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
अदा शर्माचा रिप्लाय
अदानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. फक्त भारतामधूनच नाही तर जगभरातून मला आदर दिल्याबद्दल धन्यवाद!'
I completely agree ❤️ thank you! mujhe ab sirf India se hi nahi ,world over se itni izzat dene ke liye ❤️😊 https://t.co/nEsalxKzJc
— Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023
द केरळ स्टोरी या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
2008 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
इतर महत्वाच्या बातम्या: