(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adah Sharma Birthday: हॉरर फिल्ममधून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण, बप्पी लाहिरींबद्दल केलेल्या पोस्टमुळे झालेली ट्रोल; जाणून घ्या 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माबद्दल
अदा (Adah Sharma) ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
Adah Sharma Birthday: अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) आज 31 वा वाढदिवस आहे. अदानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ती सध्या द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अदा ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जाणून घेऊयात अदा शर्माबद्दल...
हॉरर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण
अदा शर्माचा जन्म 11 मे 1992 रोजी मुंबईत झाला. अदा ही तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. 2008 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटात रजनीश दुग्गलनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 1920 चित्रपटानंतर अदा शर्मानं साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे अदा शर्मा झालेली ट्रोल
अदा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. काही दिवसांपूर्वी अदानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिनं बप्पी लाहिरी यांचा उल्लेख केला होता. अदाच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल केले होते.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी अदा शर्माचं नाव अभिनेता विद्युत जामवालसोबत जोडण्यात आले होते. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
द केरळ स्टोरीला मिळतीये प्रेक्षकांची पसंती
अदाच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: