Tanushree Dutta : ‘मीटू’ प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला! अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट
Tanushree Dutta : तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने दावा केला आहे की, मीटू प्रकरणावर उघडपणे बोलल्यानंतर तिला अनेकदा जीवे मारण्याचे प्रयत्न करण्यात आले.
Tanushree Dutta : अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक लोक या झगमगाटी क्षेत्रात येतात. मात्र, यातील काहींना तुफान प्रसिद्धी मिळते. तर, काही मात्र वेलेसोबत मागे पडतात. बॉलिवूड आभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या आता विस्मरणात गेल्या आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून तनुश्री अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर अनेक आरोप करत आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांचावर छेडछाड केल्याचे आरोप लावले होते. भारतात ‘MeToo’ चळवळ सुरू करण्याचे सर्व श्रेय तनुश्री दत्ताला दिले जाते. आता तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने दावा केला आहे की, मीटू प्रकरणावर उघडपणे बोलल्यानंतर तिला अनेकदा जीवे मारण्याचे प्रयत्न करण्यात आले.
2020 मध्ये, तनुश्री दत्ताने एका चित्रपटाच्या सेटवर आपल्यासोबत लैंगिक छळ झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर विविध उद्योगक्षेत्रातील अनेक महिलांनी अशाच अनेक गैरवर्तनाचा खुलासा केला होता. ‘MeToo’ प्रकारावर उघडपणे बोलल्याने आपल्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचा खुलासा अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच केला आहे.
एक-दोनदा नव्हे तर अनेकदा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला!
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिच्यासोबत घडलेल्या काही अपघातांबाबत मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. तनुश्री दत्ता म्हणाली की, काही दिवसांपूर्वी ती उज्जैनमध्ये होती, तेव्हा तिच्या कारचे ब्रेक निकामी झाले होते. हे एकदा नव्हे तर अनेकदा घडलं होतं. याशिवाय तिला अनेकदा विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा दावा देखील तिने केला आहे.
तनुश्री म्हणाली, 'माझ्या घरात एक नवीन मोलकरीण आली होती. ती घरात आल्यानंतर मी सतत आजारी पडू लागले होते. या प्रकारामुळे मला माझ्या अन्नात किंवा पाण्यात काहीतरी मिसळले जात असल्याचा दाट संशय येऊ लागला. माझ्या पाण्यात विष मिसळून ठार करण्याची योजना होती.’ या वर्षाच्या सुरुवातीला तनुश्रीने सोशल मीडियाद्वारे म्हटले होती की, ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिचे हे प्रयत्न हाणून सतत पाडले जात असून, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे.
मला काही झाल्यास...
तनुश्रीने तिच्यासोबत काही महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनांसाठी अभिनेता नाना पाटेकर आणि काही बॉलिवूड मंडळींवर आरोप केले होते. आपल्याला काही झाले तर चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, त्यांची लीगल टीम आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील, असे ती म्हणाली होती. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील हे कथित प्रकरण 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवरील आहे. 2020 मध्ये, अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात Metoo मोहीम सुरू करून, अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा :