Mahima Chaudhry Mother Passed Away: अभिनेत्री महिमा चौधरीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईचे झाले निधन
महिमा आणि माहिमाची मुलगी आरियाना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhry) आईचे निधन झाले आहे.
Mahima Chaudhry Mother Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhry) आईचे निधन झाले आहे. महिमा चौधरीच्या आईचे तीन ते चार दिवसांपूर्वी निधन झाल्याची, माहिती समोर आली आहे. महिमा आणि माहिमाची मुलगी आरियाना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमा आणि तिच्या मुलीसाठी हा खूप कठीण काळ आहे.
एका रिपोर्टनुसार, महिमाची आई काही महिन्यांपासून आजारी होती. अभिनेत्री महिमा आणि चौधरी कुटुंबानं अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. महिमा तिच्या आईसोबतचे तसेच तिच्या कुटुंबाचे फोटो मीडियावर फोटो शेअर करत असते.
महिमानं कॅन्सरवर केली मात
महिमा चौधरी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.काही वर्षांपूर्वी महिमाला कॅन्सरचं निदान झालं होतं. महिमानं कॅन्सरवर मात केली. अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी महिमाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मी एक महिन्या आधी महिमा चौधरीला फोन केला. तेव्हा मी यूएसमध्ये होतो. माझ्या 525 व्या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या भूमिकेबाबत मला महिमा यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यानंतर आमचे बोलणे झाले. तेव्हा मला कळाले की, महिमाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिची जगण्याची पद्धत आणि तिचा दृष्टिकोन जगभरातील महिलांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतो.
View this post on Instagram
अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिला प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी चित्रपटांमध्ये पहिली संधी दिली होती. ती एका म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे (व्हिडिओ जॉकी) म्हणून काम करायची. महिमा चौधरीला या शोमध्ये पाहिल्यानंतर सुभाष घई यांनी तिला ‘परदेस’ या चित्रपटासाठी साईन केले. हा चित्रपट 1997मध्ये प्रदर्शित झाला होता. जो हिट ठरला.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या परदेस या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये महिमासोबत शाहरूख खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. महिमा चौधरीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. इमर्जन्सी या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Emergency : 'इमर्जन्सी' चित्रपटात महिमा चौधरीची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका