(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vikram Vedha : करीनाने पाहिला सैफचा चित्रपट ‘विक्रम वेधा’, म्हणाली ‘पिक्चर ब्लॉकबस्टर’!
Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खाननेही पती सैफ अली खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. करीनाने 'विक्रम वेधा'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'विक्रम वेधा'ची (Vikram Vedha) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझर आणि ट्रेलरपर्यंत, सगळ्यालाच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, आता 'विक्रम वेधा' लवकरच सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधीच हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन आणि सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांनी पाहिला आणि चित्रपटाविषयी आपला रिव्ह्यू दिला.
‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या कुटुंबासाठी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर राकेश रोशन यांनी चित्रपटाचा संपूर्ण आढावा घेतला. 'विक्रम वेधा' पाहिल्यानंतर राकेश रोशन या चित्रपटाने आणि लेकाच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले. राकेश रोशन यांनी लिहिले की, 'मी विक्रम वेधा पाहिला, याचे जबरदस्त श्रेय दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टीमला जाते'.
करीनाने केले कौतुक
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खाननेही पती सैफ अली खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. करीनाने 'विक्रम वेधा'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर करीना कपूरने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करताना करीना कपूर खानने ‘विक्रम वेधा’चे पोस्टर पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, काय चित्रपट आहे, एकदम 'ब्लॉकबस्टर'.
एकाचवेळी 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार!
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. सैफ आणि हृतिकचा हा चित्रपट जगभरातील 100हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग मिळणारा चित्रपट ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यासह जपान, रशिया, इस्रायल, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्येही ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित केला जाणार आहे. ‘विक्रम वेधा’ हा याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..