Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!
Vikram Vedha New Poster : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे.
Vikram Vedha New Poster : अभिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' हा चित्रपट टीझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टीझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागवले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्यात चित्रपटातील दोन्ही कलाकार जबरदस्त अवतारात दिसत आहेत, त्यामुळे 'विक्रम वेधा'चे मेकर्स चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकाच फ्रेममध्ये!
पुष्कर आणि गायत्री यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'विक्रम वेधा'चे नवे पोस्टर या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहे. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे पोस्टरवरून दिसते आहे.
पाहा पोस्टर :
नव्या पोस्टरवर गन हातात घेतलेला हृतिक स्लायडिंग पोजिशनमध्ये आणि दुसरीकडे पोलिसाच्या रुपात किलिंग एक्सप्रेशन्स देत शूटिंग पोजिशनमध्ये सैफ दिसतो. पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. त्यामुळे हे नवे पोस्टर अधिक लक्षवेधी ठरत असून हृतिक आणि सैफ यांच्या चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे.
साऊथ चित्रपटाने मिळवली प्रेक्षकांची पसंती
‘विक्रम वेधा’ या साऊथ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती.
गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी 'विक्रम वेधा' हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..
Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...