एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO | भर पत्रकार परिषदेत कंगनाचं पत्रकारासोबत भांडण
या दोघांमध्ये वाद सुरु असतानाच कार्यक्रमाच्या होस्टने पत्रकाराला गप्प करण्यचा प्रयत्न केला असता, तिथे असलेल्या एका पत्रकाराने त्याचीही चांगलीच झाडाझडती घेतली.
मुंबई : अभिनेत्री कंगन राणावत तिच्या 'जजमेंटल है क्या' या सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र सिनेमाच्या गाण्याच्या लॉन्च सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कंगनाने एका पत्रकारासोबत जोरदार भांडण केलं. पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी नाव सांगताच ती त्याच्यावर भडकली आणि आरोप करायला लागली.
पीटीआय या वृत्तसंस्थेचा पत्रकार जस्टिन रावनने प्रश्न विचारण्यासाठी त्याचं नाव सांगितल्यानंतर, कंगनाला तिच्याबाबत लिहिलेली एक बातमी लक्षात आली. 'मणिकर्णिका' सिनेमाच्या वेळी कंगनाविरोधात ही बाब लिहिण्यात आली होती. मग काय, कंगनाला राग अनावर झाला आणि तिने पत्रकारवर शाब्दिक हल्लाबोल केला. भर पत्रकार परिषदेत कंगनाने पत्रकाराचा अपमान करण्यास सुरुवात केली.
पत्रकार परिषदेत जोरदार गोंधळ झाला. प्रश्न-उत्तराच्या सत्रात पत्रकार जस्टिन रावने प्रश्न विचारला असता, तिने त्याच्या अनेक आरोप लावण्यास सुरुवात केली. "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' विरोधात जाणीवपूर्वक विरोधात लिहिलं तसंच माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट केल्या," असा आरोप कंगनाने केला.
कंगना असंही म्हणाली की, "जस्टिन राव 'मणिकर्णिका' संबंधित एका मुलाखतीदरम्यान माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास होता आणि माझ्यासोबत जेवणही केलं होतं. तरीही त्याने माझ्या आणि माझा चित्रपट 'मणिकर्णिका'विरोधात वाईट गोष्टी लिहिल्या. तसंच जस्टिन रावने मला मेसेजही केला होता."
मात्र जस्टिन रावही मागे हटला नाही. कंगनाने केलेले सर्व आरोप त्याने फेटाळले. "तू माझ्यावर आरोप करु शकत नाही. पत्रकार जे काही लिहितात, ते सत्य असतं. मी कधीही तुझ्याविरोधात कधीही काहीही वाईट लिहिलेलं नाही. तसंच मी कधीही तुझ्यासोबत जेवण केलं नाही, शिवाय तुझ्यासोबत व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास नव्हतो," असं त्याने म्हटलं. जस्टिन रावने कंगनाला आपण केलेल्या ट्वीटचा आणि मेसेजचा स्क्रीन शॉट दाखवण्याचं आव्हान दिलं. यावर मी हे नंतर शेअर करेन असं कंगना म्हणाली.
या दोघांमध्ये वाद सुरु असतानाच कार्यक्रमाच्या होस्टने पत्रकाराला गप्प करण्यचा प्रयत्न केला असता, तिथे असलेल्या एका पत्रकाराने त्याचीही चांगलीच झाडाझडती घेतली. "तू दोघांमध्ये बोलू नको," असा सल्लाही होस्टला दिला.
या सोहळ्याला चित्रपटाची निर्माती एकता कपूर, अभिनेता राजकुमार राव, लेखिका कनिका ढिल्लन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवलामुडीही स्टेजवर उपस्थित होते. वाद वाढत असल्याचं पाहून एकता कपूर मध्यस्थी करुन वाद निवळण्याचा प्रयत्न केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement