Dipali Sayyed : अभिनेत्री दीपाली सय्यदचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण; राज्यपालांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण
Dipali Sayyed : दीपाली सय्यदचा 'संत मारो सेवालाल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dipali Sayyed On Sant Maro Sevalal : 'संत मारो सेवालाल' (Sant Maro Sevalal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyed) सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. राजभवनात (Raj Bhavan) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे.
दीपाली भोसले, अशोक कामले आणि फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'संत मारो सेवालाल' या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अरुण राठोड यांनी सांभाळली आहे. तर बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात आशुतोष राठोड मुख्य भूमिकेत आहे.
View this post on Instagram
'संत मारो सेवालाल' हा सिनेमा येत्या 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी अशा अनेक समस्या या सिनेमात मांडण्यात आल्या आहेत. 'संत सेवालाल' यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश अशा अनेक गोष्टींवर बेतलेला हा सिनेमा आहे.
बंजारा समाजासाठी महत्त्वाचा असलेला 'संत मारो सेवालाल' हा सिनेमा संपूर्ण भारतीय सिनेप्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे. या सिनेमाचं पोस्टर खूपच लक्षवेधी आहे. पोस्टर रिलीज झाल्याने आता संत सेवालाल यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. त्यामुळे हा सिनेमा लक्षवेधी ठरणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या