एक्स्प्लोर

यंदाची दिवाळी साधेपणानेच! दीपिका म्हणते..

बॉलिवूडची प्रसिद्धी अभिनेत्री दीपिका पदुकोण यंदाची दिवाळी साधेपणानेच साजरी करणार आहे.दीपिकाची यंदाची दिवाळी अनेक कारणांनी महत्वाची आहे.

यंदाचं वर्षं हे अनेकांना नवा अनुभव देऊन गेलेलं आहे. काहींना कोरोनाने नवं जगणं दिलं. काहींना लॉकडाऊनमुळे जगणं नकोसं झालं.. तर काहींना अनेक नव्या ताणतणावांना सामोरं जावं लागलं. 2020 हे वर्ष अशा अर्थाने ऐतिहासिक म्हणावं लागेल. मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर हे नवं वर्ष नेमकं काय दाखवणार आहे? याचा अंदाज कुणालाच नव्हता. पण महिना महिना वाढत गेला आणि वर्ष नकोसं झालं. त्यात सुशांत राजपूतच्या मृत्यूने भर पडली.

सुशांतचा मृत्यू झाला खरा.. पण या मृत्यूने अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. काहींना आर्थिक फसवणुकीबद्दल.. काहींना सुशांतशी मैत्री केली म्हणून आरोपी व्हावं लागलं. सुशांतच्या याच घटनेनं अभिनेत्री दीपिका पडुकोणलाही काही काळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. नार्कोटिक्स ब्युरोनं दीपिकाला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. चौकशी झाली.. आरोप झाले.. आणि कालांतराने दीपिका चित्रिकरणात व्यग्र झाली. आता दिवाळी आल्यानंतर दीपिकाला साहजिकच दिवाळीबद्दल विचारणा झाली. त्यावेळी दीपिकाने ही दिवाळी साधेपणानेच साजरी करायची ठरवली असल्याचं कळतं.

प्रियांका चोप्रा-निक जोनसने लॉकडाऊनमध्ये तयार केला 'फॅमिली बिझनेस' प्लान

दीपिकाला यंदाच्या दिवाळीच्या नियोजनाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, यंदाची दिवाळी आम्ही साधेपणानेच साजरी करणार आहोत. कारण अद्याप आपण कोरोनाला पळवून लावलेलं नाही. म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घेणं आवश्यक आहे. आमच्याकडेही आम्ही दिवाळी घरीच साजरी करणार आहोत. आम्ही आमचं कुटुंबं अगदी साधेपणाने दिवाळी साजरी करणार आहे. यंदाचं वर्ष अनेक गोष्टींच्या अनुषंगाने वेदनादायी आहे. त्यामुळे आम्ही घरी पूजाही करू. पण जो वेळ असेल तो घरच्यांसोबतच घालवणार आहोत.

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा संशय कंगना रनौतने व्यक्त केला होता. त्यानंतर ती ट्विटरवरून सातत्याने बोलत होती. त्यात तिने रणवीर सिंगवरही तो ड्रग घेत असल्याचा आरोप लगावला होता. दीपिकाला चौकशीसाठी ब्युरोनं बोलावलं होतं. दीपिकाच्या मॅनेजरलाही बोलवून चौकशी करण्यात आली होती. यासगळ्या पार्श्वभूमीवर दीपिकाचं दिपाळी साधेपणाने साजरी करणं याला महत्व आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVEMaharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्तीParbhani Protest : तोडफोड, मोर्चे, आंदोलनं आणि ठिय्या... परभणी का पेटलं? Special ReportUddhav Thackeray on BMC Election :बीएमसीला ठाकरेंचा पक्ष स्वबळाच्या वाटेनं जाणार का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget