KGF च्या हिरोचा टॉक्झिक चित्रपट गाजणार, बॉलिवुडमध्ये घडवणार इतिहास, शूटिंगसाठी खर्च होणार तब्बल...
Toxic Film : अभिनेता यशचा टॉक्झिक हा चित्रपट येणार आहे. सध्या या चित्रपटाचे सूटिंग चालू आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Toxic Film : ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ या चित्रपटांच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्याचं ताईत बनलेल्या यश अभिनेत्याचा लवकरच 'टॉक्झिक : अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची वेगवेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. विशेष म्हणजे यश हा अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता असल्यामुळे त्याच्या या आगामी चित्रपटात नेमकं काय असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता या चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाआधीच एक नवा विक्रम स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
संपूर्ण जगात चित्रपट होणार प्रदर्शित
गेल्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हाच चित्रपट फक्त पॅन इंडियाच नव्हे तर पॅन वर्ल्ड ठरणार आहे. कारण जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्यात येत आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाचे शूटिंगही तशाच पद्धतीने करण्यात येत आहे. चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्रदर्शित करणार आहेत. त्यासाठी या चित्रपटाच शूटिंग फक्त कन्नडच नव्हे तर इंग्रजी भाषेतही केले जात आहे. तशा पद्धतीने पटकथा, संवाद रचण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत या चित्रपटाचे शूटिंग चाल केले जात आहे.
यशच्या वाढदिवशी झाली होती चित्रपटाची घोषणा
शूटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर हा चित्रपट इंग्रजी तसेच भारताच्या वेगवेगळ्या भाषांत डब केला जाईल. त्यामुळेच हा चित्रपट फक्त पॅन इंडिया नव्हे तर पॅन वर्ल्ड ठरणार आहे. या चित्रपटाच यश हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यासह या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तार सुतारीया आदी दिग्गज चेहरे दिसणार आहेत. यशच्या वाढदिवशी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. सोबतच टॉक्झिक या चित्रपटाचे टिझरही रिलीज करण्यात आले होते. टिझर पाहूनच या चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
भारताचा सर्वांत महागडा चित्रपट ठरणार
टॉक्झिक हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नड भाषेत शूट केला जात असल्याने निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चातही वाढ झाली आहे. दोन्ही भाषांत शूटिंग होत असल्यामुळे चित्रीकरणासाठी वेळ लागणार आहे. इंग्रजी आणि कन्नड भाषेत लिहिलेला आणि शूट केला जाणारा टॉक्झिक हा भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे बजेट साधारण 40 टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सर्वाधिक महागडा चित्रपट ठरणार आहे. याआधी एस एस राजामौलीचा ‘एसएसएमबी29’ हा चित्रपट सर्वांत महागडा चित्रपट ठरेल, असे म्हटले जात होते. या चित्रपटाचे बजेट हे 1000 कोटी रुपये आहे. त्यानंतर आता टॉक्झिक या चित्रपटासाठी एसएसएमबी29 या चित्रपटापेक्षा जास्त खर्च लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :























