Vishnu Vishal : रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, अभिनेता विष्णू विशालनेही सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो!
Vishnu Vishal : रणवीरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता तमिळ अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) त्याच्यापासून प्रेरित झाला आहे.
![Vishnu Vishal : रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, अभिनेता विष्णू विशालनेही सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो! Actor Vishnu Vishal share nude photo shoot on social media Vishnu Vishal : रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, अभिनेता विष्णू विशालनेही सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/ce0553bfb8bef3fde03db8484c36c3321658643667_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vishnu Vishal : अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) नुकतेच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या रणवीरची चर्चा होती. त्याच्यावर अनेक मीम्सही बनवले गेले. रणवीरनेही त्याचे फोटो शेअर केले. त्याने हे फोटोशूट त्याच्यासाठी हे खूप सोपे असल्याचे सांगितले. तो हजारो लोकांसमोर न्यूड पोजही देऊ शकतो. रणवीरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता तमिळ अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) त्याच्यापासून प्रेरित झाला आहे. त्यानेही त्याचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेता विष्णू विशाल बेडवर पडून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहेत. विष्णूचे फोटो त्याची पत्नी आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने काढले आहेत. विष्णू विशालने कॅप्शनमध्ये लिहिले- 'ठीक आहे, ट्रेंडमध्ये सामील होत आहे... जेव्हा पत्नी ज्वाला गुट्टा फोटोग्राफर बनते.' विष्णूचे हे फोटो त्याची पत्नी-बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने क्लिक केली आहेत.
विष्णूनेही ठेवलं रणवीरच्या पावलावर पाऊल
या फोटोंमध्ये विशालने शरीराचा खालचा भाग उशीने झाकलेला आहे. यादरम्यान विष्णूने 4 वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. त्याचा फिटनेस आणि सिक्स पॅक अॅब्सही दिसत आहेत. विष्णूच्या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. विष्णू विशालने हे फोटो आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावर फॉलोअर्सनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.
पाहा पोस्ट :
विष्णू विशाल क्रिकेटर असण्यासोबतच अभिनेताही आहे. तो तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनमध्ये (TNCA) उत्कृष्ट क्रिकेट खेळला आहे. यानंतर त्याने तामिळ चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, काही चित्रपटांची निर्मितीही केली. विष्णू शेवटचा तमिळ चित्रपट ‘एफआयआर रेडी’मध्ये दिसला होता. त्याची पत्नी ज्वाला गुट्टा भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
रणवीर सिंहचं फोटोशूट
रणवीर सिंहने पेपर मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. त्याने तुर्की कार्पेटवर फोटो पोज दिली होत्या. काही चित्रांमध्ये तो बसलेला दिसत होता, काहींमध्ये तो कार्पेटवर पडून होता, तर काहींमध्ये तो उभा राहून फोटो क्लिक करत होता. त्याचे हे फोटोशूट चित्र बर्ट रेनॉल्ड्सपासून प्रेरित होते. मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या कामाबद्दल आणि फॅशनबद्दल सांगितले.
संबंधित बातम्या
Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ
Ranveer Singh Nude Photoshoot : न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग स्वतःच्या मर्जीने हिजाब परिधान करण्याचं का नाही? अबू आझमींच ट्वीट चर्चेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)