Ranveer Singh Nude Photoshoot : न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र, मग स्वतःच्या मर्जीने हिजाब परिधान करण्याचं का नाही? अबू आझमींच ट्वीट चर्चेत
Ranveer Singh Nude Photoshoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने नुकतेच एक न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.
Bollywood Celeb Nude Photoshoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने नुकतेच एक न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. त्याचं नवं फोटोशूट प्रचंड चर्चेत आलं आहे. रणवीर सिंहच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. पेपर मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. मात्र, यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी देखील एक ट्विट करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
अबू आझमी यांनी अभिनेत्यांचे न्यूड फोटो शेअर करत बॉलिवूडवर टीका करणारे एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलेय की, ‘उघड्या शरीराचे प्रदर्शन करणे याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात. दुसरीकडे संस्कृतीनुसार मुलीला हिजाबने शरीर झाकायचे असेल, तर त्याला अत्याचार आणि धार्मिक भेदभाव म्हणतात. आपल्याला कसा समाज हवा आहे? नग्न फोटो सार्वजनिकरित्या शेअर करण्याचे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब परिधान करणं का नाही?
पाहा ट्वीट :
‘नग्न फोटो सार्वजनिकरित्या शेअर करणं स्वातंत्र आहे; तर शाळा, कॉलेज आणि अशा सगळ्या जागी जिथे महिलांना बुरखा किंवा हिजाब परिधान करायचे असेल, तिथे स्वातंत्र्य का नाही?’
रणवीरचं न्यूड फोटोशूट चर्चेत
अभिनेता रणवीर सिंहने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. रणवीर सिंहला अनेकदा आगळ्या वेगळ्या अथवा अतरंगी कपड्यात पाहिलं असेल. पण त्यानं नुकत्याच केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोमध्ये रणवीर कपड्याविना टर्किश गालीच्यावर विविध पोज देत आहे. त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या पोज जो बर्ट रेनॉल्ड्सच्या कवरपासून प्रेरित आहेत. पेपर मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने त्याच्या चित्रपट आणि फॅशेनबाबत चर्चा केली आहे.
पाहा फोटोशूट
शारीरिक रुपाने न्यूड होणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. पण काही परफॉर्मेंसने मला न्यूड केलेय. तुम्ही माझा आत्मा पाहू शकता, तो किती नग्न आहे? मी हजारो लोकांसमोर नग्न होऊ शकतो, त्यानं मला काही फरक पडत नाही. फक्त ते अस्वस्थ होतात, असे रणवीर म्हणाला.
हेही वाचा:
Ranveer Singh Bold Photos : फोटोशूटसाठी रणवीर सिंह झाला न्यूड, Bold Photos चा इंटरनेटवर धुमाकूळ