एक्स्प्लोर
कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनालीचं पहिलं फोटोशूट, शस्त्रक्रियेची 20 इंचाची खूण
सोनाली बेंद्रेला मागील वर्षी जुलै महिन्यात हायग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. यानंतर ती अमेरिकेत उपचारांसाठी गेली. अनेक महिन्यांच्या उपचारांनंतर सोनाली भारतात परतली आहे.

मुंबई : कॅन्सरशी लढणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतंच वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट केलं. या फोटोमध्ये सोनाली बेंद्रे शस्त्रक्रियेची खूण स्पष्टपणे दिसत आहे. छातीपासून पोटापर्यंत 20 इंच लांबीची ही खूण आहे. सोनालीने काही नुकत्याच एका कार्यक्रमात तिच्या या खुणेबाबत वक्तव्य करत होती. "माझ्या शरीरावर ही खूण कायम राहणार हे समजल्यावर मी फार तणावात होते," असं सोनालीने तेव्हा सांगितलं होतं. आता सोनालीने ही खूण दिसेल असं फोटोशूट केलं आहे. शिवाय फोटोही शेअर केला आहे. "केसांशिवाय, कमी मेकअप आणि मोठ्या खुणेसह हे फोटोशूट असेल हे आधीच ठरवलं होतं," असं सोनालीने लिहिलं आहे. याशिवाय वोग इंडियानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनालीचे काही फोटो शेअर केले आहे. डोक्यावर हात फिरवताना सोनाली बेंद्रे म्हणाली की मी आता माझा नवा लूक स्वीकारला आहे, असं तिने म्हटल्याचं वोगने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. सोनाली बेंद्रेला मागील वर्षी जुलै महिन्यात हायग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. यानंतर ती अमेरिकेत उपचारांसाठी गेली. अनेक महिन्यांच्या उपचारांनंतर सोनाली भारतात परतली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























