(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane : सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसे देतात, पण...; किरण मानेची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त किरण मानेने खास पोस्ट लिहिली आहे.
Kiran Mane On World Theatre Day : आज जगभरात जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day) साजरा केला जात आहे. रंगकर्मींसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज दिवसभर हिंदी सिनेसृष्टीसह मराठी कलाकारांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता किरण मानेनेदेखील (Kiran Mane) 'सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसे देतात', असं म्हणत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण मानेची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)
किरण मानेने लिहिलं आहे,"सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देतात... नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं. रंगभूमीने मला ओळख दिली, आत्मविश्वास दिला, समाजाचं भान दिलं, भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला... उच्च अभिरुचीचं वरदान दिलं...सांस्कृतीक श्रीमंती दिली".
किरण मानेने पुढे लिहिलं आहे,"रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं. अजून काय पाहिजे? सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा". किरण मानेंची ही पोस्ट आज चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
किरण मानेबद्दल जाणून घ्या...
किरण मानेला शाळेत असतानाच नाटक आणि अभिनयाची गोडी लागली. आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. आजवर त्याने अनेक नाटकात काम केलं असून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आज जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत त्याने नाटकातले फोटोदेखील शेअर केले आहे.
किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात. सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असल्याने अनेकदा तो वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकतो. पण तरीही त्याची प्रत्येक पोस्ट लक्षवेधी असते. 'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे किरण माने चर्चेत आला. तर 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. तो या पर्वाचे विजेता होणार अशी शक्यतादेखील वर्तवली जात होती. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तो 'टॉप 5'मध्ये पोहेचला होता. पण अखेर अक्षय केळकर विजेता ठरला. सध्या किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.
संबंधित बातम्या