एक्स्प्लोर
Advertisement
उपचार संपले, इरफान खान लवकरच मायदेशात परतणार!
इरफान भारतात आल्यानंतर 'हिंदी मीडियम-2' च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
मुंबई : अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लंडनमध्ये सात महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर इरफान खान आता मायदेशात परतणार आहे. इरफान न्यूरोएन्ड्रोक्राईन ट्यूमरवर लंडनमध्ये उपचार घेत होता.
इरफान खान मुंबईत परतणार आहे. येत्या एक-दोन दिवसात तो मेडिकल ट्रीटमेंट घेऊन मुंबईत परतेल. याशिवाय त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज आहे, असं बॉलिवूड लाईफच्या एका वृत्तात म्हटलं आहे.
दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट
इरफान भारतात आल्यानंतर 'हिंदी मीडियम-2' च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. 'हिंदी मीडियम'चे निर्माते लंडनमध्ये इरफानला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली. यानंतर त्याने सीक्वेलमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं.
इरफानच्या आजारपणावर पत्नीची फेसबुक पोस्ट
हिंदी मीडियम या 2017 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात इरफानसोबत सबा करीम झळकली होती. साकेत चौधरीने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक होमी अडजानियांकडे दिग्दर्शनाची धुरा सोपवली जाणार आहे.
यापूर्वी, उपचारांमुळे इरफानने दोन प्रोजेक्ट्समधून माघार घेतली होती. दीपिका पादूकोणसोबत विशाल भारद्वाज दिग्दर्शित एका चित्रपटातून त्याने बॅकआऊट केलं, तर 'गॉरमिंट' ही राजकीय उपहासात्मक वेब सीरिजही त्याने सोडली. काहीच आठवड्यांपूर्वी त्याची मुख्य भूमिका असलेला 'कारवां' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement