एक्स्प्लोर
अभिनेता दीपक तिजोरीविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचाराची केस
मुंबई : अभिनेता दीपक तिजोरीच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पत्नी शिवानीने त्याच्याविरोधात बोरीवली कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवानीने दीपकला मुंबईतील गोरेगावच्या 4 बीएचके फ्लॅटमधून बाहेर काढलं होतं. शिवाय तिने घटस्फोटासाठीही अर्ज केला होता. त्यानंतर दीपकला समजलं की, शिवानीने तिच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतलेला नाही, त्यामुळे कायदेशीररित्या ती आपली पत्नी नाही.
काय आहे वाद?
काही वृत्तानुसार, शिवानी दीपकला घरातली केवळ एकच रुम वापरण्यास देत असे. इतकंच नाही तर दीपकसाठी जेवण करायचं नाही आणि त्याची रुम साफ करायची नाही, असंही तिने नोकरांना बजावला आहे. त्यामुळे दीपक पीजी किंवा एखाद्या मित्राच्या घरी राहत असे.
शिवानीचा आरोप
"दीपकचं योग इन्स्ट्रक्टरसोबत अफेअर असून ती त्याच्यापेक्षा वयाने फारच लहान आहे," असा आरोप शिवानीने केला आहे.
पोटगीसाठीही केस
शिवानीने 125 सीआरपीसी अंतर्गत केस दाखल करुन म्हटलं की, "मी माझा खर्च भागवू शकत नाही. दीपक सक्षम आहे, त्यामुळे त्याने माझा आणि मुलीचा खर्च करावा." मात्र शिवानी, दीपकची कायदेशीर पत्नी नाही, त्यामुळे पोटगीसाठी तिने केलेली केस चुकीची आहे.
दीपकचे चित्रपट
दीपक तिजोरीने खिलाडी, गुलाम, जो जीता वही सिंकदर, अंजाम यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
