एक्स्प्लोर
दिग्दर्शक कट-कट ओरडत बसला, पण इथे या दोघांनी एकमेकांचे ओठ काही सोडलेच नाही; कोण होते 'ते' दोन स्टार्स?
Bollywood Superstars Romantic, Kissing Scene: बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये अनेक बोल्ड आणि रोमँटिक सीन्स चित्रित करण्यात आले आहेत.
Bollywood Superstars Romantic, Kissing Scene
1/9

आपल्याला अनेकदा या सीन्सबाबत खूप प्रश्न पडतात. अनेक स्टार्सनी असे सीन्स शूट करताना घडलेल्या काही गोष्टींबाबत मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.
2/9

बॉलिवूड सिनेमांसाठी आजवर असे अनेक बोल्ड आणि रोमँटिक सीन्स चित्रित करण्यात आले आहेत.
3/9

अनेकदा असे सीन्स शूट करताना अभिनेते आणि अभिनेत्रीचा देहभान हरपल्याचे प्रकारही घडल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच एक किस्सा घडलेला, 'अ जेंटलमन: सुंदर, सुशील, रिस्की' सिनेमाच्या शुटिंगवेळी.
4/9

या सिनेमात सिद्धार्थ आणि जॅकलीनची सुपरहिट जोडी झळकली होती. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अनेक रोमँटिक सीन्सही होते.
5/9

'अ जेंटलमन'मधील 'लागी ना छुटे' या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा एक अतिशय रोमँटिक किसिंग सीन होता.
6/9

सिनेमातला किसिंग सीन शूट करताना दोघेही एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले की, दिग्दर्शक राज आणि डीके यांनी कित्येकदा कट म्हटल्यावरही ते थांबले नाहीत.
7/9

चित्रपटाचे दिग्दर्शक राज म्हणाले की, चित्रपटाच्या किसिंग सीनवर सेन्सॉरची कात्री चालली नाही. हा सीन शूट करताना संपूर्ण सीन हवा तसा शूट करुन झाला. त्यानंतर मी कट असं म्हटलं, सेटवरचे सगळे थांबले, पण सिद्धार्थ आणि जॅकलीन एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले की, त्यांना माझा आवाज ऐकू येत नव्हता.
8/9

दरम्यान, जॅकलिननं यावर बोलताना स्पष्टिकरण दिलेलं, ती म्हणालेली की, सीनचं शुटींग सुरू करण्यापूर्वी दिग्दर्शकांनी सांगितलेलं की, हा सीन व्यवस्थित शूट करायचा आहे. त्यामुळे ते अनेकदा कट म्हणत होते, पण त्यावेळी आम्हाला थांबायचं नव्हतं. आणि ज्यावेळी आम्हाला खरंच थांबायचं होतं, त्यावेळी आम्हाला माहीतच नव्हतं की, सीन शूट करुन झालेला आहे आणि आता थांबायचं आहे.
9/9

सिद्धार्थ मल्होत्रा याबाबत बोलताना म्हणाला की, या गाण्यात जॅकलीन खूपच हॉट दिसत होती. म्हणून त्यावेळी त्याला स्वतःला सावरणं जरा अवघड झालेलं.
Published at : 22 Aug 2025 12:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























