Jalgaon Crime News : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले आहे.

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राण घातक हल्ला (Jalgaon Crime News) करण्यात आला आहे. माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले आहे. या हल्ल्यात प्रभाकर चौधरी (Prabhakar Chaudhary) यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर रित्या (Crime News) जखमी झाले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा हल्ला नेमका कुणी आणि कुठल्या कारणावरून करण्यात आलाय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून तपासाअंती सत्य कळू शकणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन
मिळलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. अशातच रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी प्रभाकर चौधरी यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. त्यांनतर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहे. हा हल्ला कुणी आणि का केला हे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकलेलं नाही.
अंबाजोगाईत डोक्यात सपासप वार करून तरुणाची निघृण हत्या
बीडच्या अंबाजोगाईतील रायगड नगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली. अज्ञात आरोपींनी (Crime News) दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.यानंतर अविनाश देवकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला.या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























